Join us   

सावधान! हौस म्हणून हायहिल्स वापरताय? मग तुम्हालाही असू शकतो या आजाराचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 7:21 PM

High heels side effects : पावसाळी चप्पल सध्या वापरत असले तरी कधीतरी हिल्स घालण्याची इच्छा होते.

मुलींना स्पेशली वेगवेगळ्या ड्रेसवर वेगवेगळ्या सॅण्डल वापरण्याची सवय असते. हाय हिल्स घालायला अनेकजणींना आवडतं.  फॅशन ट्रेण्ड  सतत बदलत राहतो. फॅशनच्या बरोबरीनं राहायला तर सर्वांनाच आवडतं. कपड्यांच्या फॅशनपासून पायातल्या जोड्यापर्यंत सर्व काही नेहेमी बदलत असतं. पावसाळी चप्पल सध्या वापरत असले तरी कधीतरी हिल्स घालण्याची इच्छा होते. कधीतरी फॅशनच्या बरोबरीनं राहण्यात काही वाईट नाही. पण फॅशन फॉलो करताना आपल्या शरीराला त्रास होतो त्याकडे दुर्लक्ष केल्यानं समस्या वाढत जाते. 

सांध्यांवर परिणाम

उंच टाचेच्या चपला सांध्यांवर परिणाम करतात. यामुळे उडी मारण्यावर आणि पायी चालण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. आपली चाल मंदावते आणि उंच टाचेच्या चपला सातत्यानं वापरल्यानं आपल्याला जोरात उडीही मारता येत नाही. कालांतरानं पाठदुखीचा त्रासही वाढू शकतो. 

मणक्यांवर परिणाम

हाय हिल्स आपल्या मणक्याची हाडं कमजोर करण्यासाठी कारणीभूत ठरतात. हाय हिल्स सॅन्डल वेअर केल्याने आपल्या पायांच्या स्नायूंवर दबाव येतो. तसेच पाठ आणि कंबरेमध्ये वेदना होतात. त्यामुळे तुम्ही फुटवेअर्स खरेदी करताना फॅशन सोबतच पायांच्या आरोग्याचाही विचार करणं आवश्यक आहे. पोटरीचे स्नायू खूप कडक असल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने चपला वापरल्यामुळे त्रास होतो. त्यासाठी काही muscle stretching चे व्यायाम अत्यंत उपयुक्त ठरतात.

टाचांची झिज होते

उंच टाचेच्या चपला घालण्याची हौस म्हणजे पायाच्या आजारांना निमंत्रणच आहे. टाचेची झीज होणे, पोटरीच्या स्नायूंवर ताण पडणे आणि plantar fascia खूप जास्त ताणला जाणे या सगळ्याच गोष्टी एकत्रित परिणाम करतात. म्हणजेच टाचदुखी झाली तर तिचं मूळ कारण शोधून उपाय केला तर त्याचा अचूक उपयोग होतो. आपण कोणत्या प्रकारचे बूट/चप्पल वापरतो याचा गंभीरपणे विचार करायला पाहिजे. फक्त मॅचिंग आहे, छान आहे, सध्या फॅशन आहे, म्हणून कोणत्याही प्रकारच्या चपला घालणं महागात पडू शकतं. म्हणून आरामदायक चपलांची निवड करा.  

टॅग्स : हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सब्यूटी टिप्सआरोग्य