Join us

हाय बीपीमुळे महिलांच्या जीवाला अधिक धोका, हृदयरोग टाळण्यासाठी करता येतील 'हे' ५ उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 18:01 IST

Heart Disease In Women : अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अ‍ॅन्ड प्रीव्हेंशननुसार, अमेरिकेत 60 मिलियनपेक्षा अधिक महिला वेगवेगळ्या हृदयरोगांची पीडित आहेत. त्याशिवाय भारतात हृदयरोग महिलांमध्ये मृत्यूचं एक मुख्य कारण आहे.

Heart Disease In Women : आजकाल महिला वेगवेगळ्या आजारांच्या शिकार होत आहेत. याची कारणेही वेगवेगळी आहेत. पण महिलांमध्ये कार्डिओवस्कुलर डिजीज (CVD) म्हणजेच हृदयासंबंधी आजार जीव गमावण्याचे मुख्य कारण आहेत. कोणत्याही वयातील महिलांना हे आजार इफेक्ट करतात. त्याहूनही चिंतेची बाब म्हणजे अशी स्थिती असूनही महिलांमध्ये कार्डिओवस्कुलर डिजीजचे निदान आणि उपचार कमी होतात. कारण काय तर महिलांना हृदयासंबंधी आजारांबाबत कमी माहिती असणे.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अ‍ॅन्ड प्रीव्हेंशननुसार, अमेरिकेत 60 मिलियनपेक्षा अधिक महिला वेगवेगळ्या हृदयरोगांनी पीडित आहेत. त्याशिवाय भारतात हृदयरोग महिलांमध्ये मृत्यूचं एक मुख्य कारण आहे. एका रिपोर्टनुसार, 2017 मध्ये भारतात कार्डिओवस्कुलर डिजीजमुळे 2.64 मिलियन मृत्यू झाले, त्यात  1.18 मिलियन महिला होत्या.

हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयरोगांचा धोका अधिक वाढते. तसेच इतरही आजारांचा धोका वाढतो. अशात हाय ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवणं खूप महत्वाचं ठरतं. यासाठी काय उपाय करता येतील तेच पाहुयात.

हाय ब्लड प्रेशरमुळे होणारे आजार

हार्ट अ‍ॅटॅक किंवा स्ट्रोक

हार्ट फेलियर

किडनी संबंधी समस्या

डोळ्यांसंबंधी समस्या

मेटाबॉलिक सिंड्रोम

डिमेंशिया

हाय बीपी को कंट्रोल ठेवण्याचे उपाय

नियमित व्यायाम

नियमित व्यायाम केल्यानं ब्लड प्रेशर सामान्य ठेवण्यास मदत मिळते. तसेच व्यायामानं हृदय मजबूत होतं. म्हणजे कमी मेहनतीनं हृदय अधिक ब्लड पंप करतं. ज्यामुळे रक्तवाहिन्यांवर दबाव कमी पडतो.

हेल्दी डाएट

हाय बीपीची समस्या कंट्रोल ठेवण्यासाठी हेल्दी डाएटही खूप महत्वाची ठरते. ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यासाठी कडधान्य, फळं, पालेभाज्या आणि कमी फॅट असलेले पदार्थ खावेत. त्याशिवाय मीठ कमी खा, प्रोसेस्ड फूड्स टाळा.

दारू-सिगारेट टाळा

हाय बीपीची समस्या असेल तर दारू आणि सिगारेट बंद करायला हवी. या गोष्टींमुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि हृदयरोगाचा धोकाही अधिक वाढतो.

झोपही गरजेची

ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी पुरेशी झोप खूप महत्वाची ठरते. रोज किमान 7 ते 8 तासांची झोप घ्यावी. यानं हाय बीपी मेंटेन राहतं. स्ट्रेस कमी होतो. 

टॅग्स : हृदयरोगहृदयविकाराचा झटकाहेल्थ टिप्सआरोग्य