Kidney Failure Cause : आपल्या शरीरात वेगवेगळे अवयव असतात, हे अवयव कुठेना कुठे एकमेकांशी कनेक्टेड असतात. त्यामुळेच जर एखादा आजार झाला तर त्यानं केवळ एकच नाही तर शरीरातील वेगवेगळे अवयव प्रभावित होतात. हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीस हे आजार तर खूप घातक मानले जातात. हे दोन्ही आजार लोकांच्या किडनीचं नुकसान करत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे या आजारांमुळे किडनीची नुकसान गपचूप होत आहे. हाय बीपी आणि शुगर साधारण 70-80% क्रॉनिक किडनी रोगांच्या केसेससाठी जबाबदार आहे. क्रॉनिक किडनी आजारांसोबत मिळून हे आजार अधिक गंभीर समस्या निर्माण करतात.
आपल्याला माहीत आहेच की, किडनी शरीरात नॅचरल फिल्टरचं काम करतात. शरीरात खाण्याच्या माध्यमातून पोहोचणारे अपशिष्ट पदार्थ बाहेर काढण्याचं काम करतात. फ्लूइड कायम ठेवण्याचं आणि ब्लड प्रेशर नियंत्रित करण्याचं देखील काम किडनीचं असतं. पण हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीस किडनीच्या छोट्या छोट्या फिल्टरिंग यूनिटचं नुकसान करतात.
शुगर आणि हाय बीपीनं किडनीचं नुकसान
डायबिटीमुळे ब्लडमध्ये शुगरचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे किडनीमधील छोट्या रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं. या स्थितीला डायबिटीस नेफ्रोपॅथी नावानं ओळखलं जातं. तेच हाय ब्लड प्रेशरनं किडनीच्या रक्तवाहिन्यांवर दबाव पडतो. रक्तवाहिन्या कमजोर होतात आणि त्यांची फिल्टर करण्याची क्षमता कमी होते. दोन्ही आजार एकत्र येऊन एक घातक कॉम्बिनेशन तयार करतात. जे गपचूप किडनीचं नुकसान करतात.
किडनी होऊ शकते डॅमेज
डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशर किडनी डॅमेज करू शकतात. ज्यामुळे किडनीची कार्यक्षमता कमी होऊ शकते. असं झाल्यास शरीरात फ्लूइड आणि सोडिअम रिटेंशननं ब्लड प्रेशर आणखी बिघडू शकतं. अशात एक अशी सायकल सुरू होते, जी शेवटपर्यंत माहीत पडत नाही.
किडनीच्या आजाराची लक्षणं
पाय आणि चेहऱ्यावर सूज
रात्री पुन्हा पुन्हा लघवी येणे
लघवीतून फेस येणे
थकवा, कमजोरी, भूक न लागणे
हाय ब्लड प्रेशर
किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय करावं?
ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवा. डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी HbA1c 7 टक्क्यांपेक्षा कमी ठेवा. ब्लड प्रेशर 130/80 mmHg पेक्षा कमी ठेवण्याचं टार्गेट ठेवा. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानं वेळेवर औषधं घ्या.
- वर्षातून एकदा किडनीच्या टेस्ट करा. या टेस्ट ब्लड आणि लघवीच्या माध्यमातून करू शकता.
- किडनीसाठी हेल्दी आहार महत्वाचा आहे. जास्त मीठ, साखर, रेड मीट आणि तळलेले पदार्थ टाळा. फळं, भाज्या आणि कडधान्य खा.
- रोज कमीत कमी ३० मिनिटं फिजिकल अॅक्टिविटी करा. ज्यात पायी चालणे किंवा इतर व्यायामाचा समावेश करा. तसेच दिवसभरातून ८ ते १० ग्लास पाणी प्या.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घेऊ नका. जास्त पेनकिलर खाणं टाळलं पाहिजे.