Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लिव्हर डॅमेज होत असल्याचं एक लक्षण रात्री दिसू शकतं, ‘असं’ होत असेल तर डॉक्टरांकडे जा तातडीने!

लिव्हर डॅमेज होत असल्याचं एक लक्षण रात्री दिसू शकतं, ‘असं’ होत असेल तर डॉक्टरांकडे जा तातडीने!

Liver Damage Sign at Night : लक्षण एकही असू शकतं किंवा अधिकही असू शकतात. पण एक संकेत रात्री दिसतो, जो दिसताच वेळीच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:40 IST2025-06-18T16:35:07+5:302025-06-18T19:40:52+5:30

Liver Damage Sign at Night : लक्षण एकही असू शकतं किंवा अधिकही असू शकतात. पण एक संकेत रात्री दिसतो, जो दिसताच वेळीच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे.

Hidden sign of liver damage that you can see at night | लिव्हर डॅमेज होत असल्याचं एक लक्षण रात्री दिसू शकतं, ‘असं’ होत असेल तर डॉक्टरांकडे जा तातडीने!

लिव्हर डॅमेज होत असल्याचं एक लक्षण रात्री दिसू शकतं, ‘असं’ होत असेल तर डॉक्टरांकडे जा तातडीने!

Liver Damage Sign at Night : लिव्हर जर खराब झालं तर शरीरातील क्रिया प्रभावित होतात. लिव्हर शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. लिव्हर अन्न पचन आणि रक्तातून घातक विषारी तत्व व केमिकल्स बाहेर काढण्यास मदत करतं. पण जेव्हा शरीरात फार जास्त विषारी तत्व जमा होतात, तेव्हा सगळ्यात आधी ते लिव्हर डॅमेज करू लागतात.

लिव्हर डॅमेज होत असेल तर शरीरात वेगवेगळी लक्षणं दिसतात. लक्षण एकही असू शकतं किंवा अधिकही असू शकतात. पण एक संकेत रात्री दिसतो, जो दिसताच वेळीच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. डॉक्टरांनी जर टेस्ट सांगितली तर लगेच करावी. दुर्लक्ष कराल तर मोठी समस्या होऊ शकते.

लिव्हर डॅमेजचं रात्री दिसणारं लक्षण

जर तुम्हाला रात्री झोप लागण्यास समस्या होत असेल आणि कोणत्याही प्रकारचा आराम मिळत नसेल तर हा लिव्हर डॅमेजचा संकेत असू शकतो. एनएचएसनुसार, जेव्हा लिव्हर टॉक्सिन बाहेर काढू शकत नाही तेव्हा हे टॉक्सिन मेंदुपर्यंत पोहोचतात. ज्यामुळे झोप न लागणे किंवा इन्सोम्नियाची समस्या होऊ शकते.

लिव्हर सिरोसिसचा धोका

लिव्हर जेव्हा डॅमेज होऊ लागतं तेव्हा संकेत मिळत नाहीत. एनएचएसनुसार, लिव्हरमुळे झोप न लागणं हे एक अॅडव्हांस लक्षण आहे. हे लिव्हर खूप डॅमेज झाल्यावर दिसतं. लिव्हर पूर्णपणे डॅमेज झाल्यावर लिव्हर सिरोसिस होऊ शकतो.

वेळीच डॉक्टरांना दाखवा

जर तुम्हाला खूप दिवसांपासून झोप येत नसेल आणि सोबत लिव्हरसंबंधी इतर काही लक्षणं दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. त्यानंतर योग्य त्या टेस्ट करा आणि त्यानुसार उपचार घ्या.

इतरही काही लक्षणं

नेहमीच पोटात दुखणे

भूक न लागणे

थकवा

सतत आजारी पडणे

डायरिया

थकवा जाणवणे

वजन कमी होणे

त्वचेवर खाज येणे

विष्ठेचा रंग बदलणे

लिव्हर हेल्दी ठेवण्याची पद्धत

दारू, फॅट आणि शुगर या गोष्टी लिव्हरला सगळ्यात जास्त खराब करतात. त्यामुळे या गोष्टींचं सेवन कमी करा. सोबतच लाइफस्टाईल अॅक्टिव ठेवा. नियमितपणे एक्सरसाईज करा.

Web Title: Hidden sign of liver damage that you can see at night