भारतीय हवामान विभागाने मंगळवारी २५ फेब्रुवारी आणि बुधवार २६ फेब्रुवारीला मुंबई आणि त्याच्या जवळच्या भागात उष्णतेच्या लाटांचा इशारा दिला आहे. (Heat Wave Safety Tips) आयएमडीच्या मते, या दोन दिवसात मुंबईत कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जे फेब्रुवारी महिन्यात जवळपास ५ अंश सेल्सिअरपेक्षा जास्त असेल. (Dealing with Extreme Heat)
आयएमडीने वायव्य भारतातील किमान तापमान हळूहळू वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हे तापमान किमान पुढील चार दिवस तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. (Summer Skin Care in Heat Waves) त्यानंतर दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होईल. वाढत्या उन्हाच्या तडाख्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.
फळं खाल्ल्यानंतर लगेच पिऊ नका पाणी! होतील उलट्या-वाढेल मळमळ, उन्हाळ्यात ‘ही’ घ्या काळजी..
उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे शरीरावर अनेक प्रकारचे परिणाम होतात. (Heat Wave Health Risks) फेब्रुवारी महिन्यात वातारवणात थोड्या फार प्रमाणात गारवा अनुभवायला मिळतो. होळीनंतर वातावरणात बदल होतो ज्यामुळे उष्णतेचा पारा हळूहळू वाढू लागतो. उन्हाळा सुरु होण्याआधीच आपल्याला उन्हाचा त्रास होतोय. या काळात घराबाहेर पडताना आरोग्याची कशी काळजी घ्यायला हवी, जाणून घेऊया.
उन्हाळ्यात असे करा स्वत:चे संरक्षण
1. ऊन जास्त असल्यामुळे भरपूर पाणी पिणं प्यायला हवे. ज्यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल. डिहायड्रेशनची समस्या कमी होऊ शकते.
2. या काळात शरीराला ताण मिळणार नाही असे व्यायाम करु नका. अन्यथा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
3. या वेळी अचानक ताप येणं, अंगदुखी, घशात खवखवणं, सर्दी, डोके दुखी यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
4. उन्हाळ्यात अधिक प्रमाणात उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा. अतिप्रमाणात पदार्थ खाऊ नका, यामुळे अपचनाचा त्रास, डायरिया, उटट्या होऊ शकतात.
5. चालताना धाप लागत असेल किंवा खूप उन्हाचा तडाखा बसत असेल तर सावलीत विश्रांती करा. शरीरातील रक्तदाब अचानक कमी झाल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते.
6. दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान घराबाहेर पडून नका. बाहेरचे तापमान जास्त असल्यामुळे कठीण कामे करणे टाळा.
7. अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स टाळा, ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होते.
8. जर तुम्ही बाहेर काम करत असाल तर टोपी किंवा छत्री वापरा. घराबाहेर पडण्यापूर्वी सनग्लासेस- स्कार्फचा वापर करा. ज्यामुळे त्वचेचे आणि डोळ्यांचे रक्षण होईल.
9. वाढत्या उकाड्यात थंड पेयांवर अधिक भर द्या. दही, ताक, लस्सी प्या. घराबाहेर पडताना किमान दोन ग्लास पाणी प्या. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहिल.
10. उन्हाच्या अतिनिल किरणांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी सनस्क्रिनचा वापर करा. ज्यामुळे त्वचा टॅन पडणार नाही.