Join us

तासंतास एका जागी बसून काम केल्यानं वाढतेय शुगर, वजनवाढ आणि डायबिटिस टाळण्यासाठीं ४ उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 14:47 IST

Health Tips : हृदयरोग एक्सपर्ट डॉ. जेरेमी लंदन (Jeremy London, MD) यांनी सांगितलं की, जास्त वेळ एकाच जागी बसून काम केल्यानं कोणत्या समस्या होतात.

Health Tips : आजच्या डिजिटल युगात लोक तासंतास लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसमोर बसून काम करतात. तासंतास एकाच जागी बसून काम करतात. काम करताना तर काही वाटत नाही, पण नंतर काही काळानं अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. हृदयरोग एक्सपर्ट डॉ. जेरेमी लंदन (Jeremy London, MD) यांनी इन्स्टाग्रामवर सांगितलं की, जास्त वेळ एकाच जागी बसून काम केल्यानं कोणत्या समस्या होतात. सोबतच या समस्यांपासून बचाव करण्यासाठी काय करावं हेही त्यांनी सांगितलं.

जास्त वेळ बसून काम करण्याचे नुकसान

कंबर आणि मानदुखी

सतत एकाच जागी बसून काम केल्यानं पाठ, मान आणि कंबरेच्या स्नायूंमध्ये तणाव वाढतो. त्यामुळे या अवयवांमध्ये वेदना होतात. तसेच चुकीच्या पोश्चरमध्ये बसले तर मणक्यामध्येही समस्या होतात.

टाइप २ डायबिटीस

जेव्हा आपण सतत एकाच जागी बसून तासंतास काम करतो तेव्हा आपलं शरीर इन्सुलिनचा व्यवस्थित वापर करू शकत नाही. यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते आणि टाइप २ डायबिटीसचा धोकाही अधिक वाढतो.

लठ्ठपणा वाढतो

दिवसभर जर शरीराची अजिबात हालचाल होत नसेल तर कॅलरी बर्न होत नाहीत. त्यामुळे शरीरात चरबी जमा होते. नंतर पुढे लठ्ठपणा वाढतो आणि वजनही वाढतं. एकदा जर लठ्ठपणा वाढला तर वेगवेगळ्या गंभीर आजारांचा धोकाही वाढतो.

हृदयरोग

जास्त वेळ बसून राहणं हृदयाच्या आरोग्यासाठी देखील नुकसानकारक ठरतं. शरीराची हालचाल केली नाही तर कोलेस्टेरॉल वाढतं, ब्लश प्रेशर वाढतं. नंतर हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोकाही वाढतो.

काय कराल?

दर तासाला ब्रेक घ्या

ऑफिसमध्ये काम करत असताना दर ३० मिनिटांनी किंवा ६० मिनिटांनी ब्रेक घ्या. २ ते ३ मिनिटांच्या या ब्रेकमध्ये थोडं चाला. शरीराची हालचाल करा. स्ट्रेचिंग करा. असं केल्यास आपल्याला फ्रेश वाटेल आणि वरील समस्याही टाळता येतील.

बाहेरचं खाणं टाळा

बरेच लोक ऑफिसमध्ये बाहेरचं जेवण मागवतात. एखाद्या वेळेस असं करणं ठीक आहे. पण जर नेहमीच असं करत असाल तर पुढे जाऊन मोठ्या समस्या होऊ शकतात. अशात रोज घरचं जेवणच केलं पाहिजे.

हायड्रेटेड रहा

ऑफिसमध्ये आपल्या डेस्कवर एक पाण्याची बॉटल न विसरता ठेवा. दिवसभर थोडं थोडं पाणी पित रहा. असं केल्यास शरीर हायड्रेट राहतं आणि थकवाही दूर होतो. 

मेंदुला आराम द्या

कामाच्या मधे छोटे छोटे ब्रेक घेतल्यानं मेंदुला आराम मिळतो. मेंदू शांत होतो. बसल्या जागी छोट्या अ‍ॅक्टिविटी करा. यामुळे तणाव कमी होतो. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स