Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हृदय ठणठणीत ठेवायचंय? रात्रीच्या जेवणाची 'ही' योग्य वेळ पाळा, अनेक गंभीर आजारही टाळा

हृदय ठणठणीत ठेवायचंय? रात्रीच्या जेवणाची 'ही' योग्य वेळ पाळा, अनेक गंभीर आजारही टाळा

Heart Health Tips: रोजच रात्री उशिरा जेवण करण्याची सवय हृदयसाठी घातक संशोधनातून खुलासा. झोपण्याच्या तीन तास आधी जेवाल तर काय दिसेल फरक पाहा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 10:33 IST2026-02-25T10:26:15+5:302026-02-25T10:33:38+5:30

Heart Health Tips: रोजच रात्री उशिरा जेवण करण्याची सवय हृदयसाठी घातक संशोधनातून खुलासा. झोपण्याच्या तीन तास आधी जेवाल तर काय दिसेल फरक पाहा.

Heart Health Tips: Eat early live longer study reveals heart health benefits of pre bedtime fasting | हृदय ठणठणीत ठेवायचंय? रात्रीच्या जेवणाची 'ही' योग्य वेळ पाळा, अनेक गंभीर आजारही टाळा

हृदय ठणठणीत ठेवायचंय? रात्रीच्या जेवणाची 'ही' योग्य वेळ पाळा, अनेक गंभीर आजारही टाळा

Heart Health Tips: ऑफिसमधून निघून घरी रात्री उशिरा पोहोचणं हे हल्लीचं रूटीनच झालं आहे. म्हणजे बऱ्याच लोकांचं जेवण रात्री १० वाजता किंवा त्यापेक्षाही लेट होतं. काही लोक घरी लवकर पोहोचून जेवण करत असताना टीव्ही किंवा फोन बघत बसतात. काही होणार नाही असा विचार करून हेच रूटीन फॉलो केलं जातं. पण वैज्ञानिकांचं मत आहे की, हीच रात्री उशिरा जेवण्याची आणि फोन किंवा टीव्ही बघण्याची सवय आपलं हृदय निरोगी करत आहे. अमेरिकेच्या नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याच सवयीवर खोलवर अभ्यास केला. त्यांनी लोकांना ना कॅलरी कमी करायला सांगितल्या, ना आहार बदलायला सांगितला. त्यांनी लोकांना फक्त एक बदल सुचवला, तो म्हणजे झोपण्याच्या कमीत कमी ३ तास आधी जेवण करा.

बायोलॉजिकल क्लॉक आणि जेवणाची वेळ 

आपलं शरीर हे २४ तासांच्या बायोलॉजिकल क्लॉकवर चालतं. ज्याला सर्केडिअन रिदम म्हणतात. पण जेव्हा आपण रात्री उशिरा जेवण करतो, तेव्हा शरीराला संकेत मिळतो की, अजून दिवस आहे. वरून लख्ख प्रकाश आणि फोनची स्क्रीन झोपेच्या तयारीला आणखी उशीर करते. ज्यामुळे हृदय आणि मेटाबॉलिज्मवर दबाव पडतो. या संशोधनाच्या लेखिका प्रोफेसर फिलिस जी यांच्यानुसार, फक्त हे महत्वाचं नाही की, आपण काय आणि किती खाता. महत्वाचं हे आहे की, आपण ते कधी खाता. 

संशोधनात काय आढळलं? 

या संशोधनात ३६ ते ७५ वयोगटातील ३९ जास्त वजन किंवा लठ्ठपणाने ग्रस्त लोकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. या सगळ्यांना हृदय आणि मेटाबॉलिज्म आजारांचा धोका जास्त होता. हे संशोधन ७.५ आठवडे चाललं. सहभागी लोकांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं. पहिला ग्रुप आपल्या सामान्य सवयीनुसार ११ ते १३ तास उपवास करत राहिला. दुसऱ्या ग्रुपने उपवासाची वेळ वाढवून १३ ते १६ तास केली आणि झोपण्याच्या कमीत कमी ३ तास आधी खाणं बंद केलं. दोन्ही ग्रुप्सना झोपण्याच्या तीन तास आधी दिवे मंद करण्याचा सल्ला देण्यात आला. जेणेकरून बायोलॉजिकल क्लॉक संतुलित राहील. 

काय समोर आलं? 

साधारण ७.५ आठवड्यांनंतर आश्चर्यकारक बदल दिसून आले. त्यांच्या रात्री ब्लड प्रेशर ३.५ टक्के कमी आढळलं. झोपेदरम्यान हृदयाच्या ठोक्यांमध्ये ५ टक्के कमी दिसली. ब्लड शुगर कंट्रोलमध्येही सुधारणा दिसली, तसेच इन्सुलिनही योग्यपणे तयार झालं. याचा अर्थ असा झाला की, शरीर दिवस आणि रात्र यात योग्य ताळमेळ बसवू लागलं. दिवसा एनर्जी जास्त आणि रात्री चांगला आराम हाच हृदयासाठी हेल्दी पॅटर्न मानला जातो.

सोपा आणि प्रभावी उपाय 

या संशोधनातून हे स्पष्ट झालं की, आरोग्य सुधारण्यासाठी नेहमी भरपूर आहार आणि एक्सरसाईजच गरजेची नाही. कधी कधी जेवणाच्या वेळेत केलेल्या बदलानेही मोठा फरक दिसून येतो. मध्यम वय आणि वृद्ध लोकांसाठी खासकरून हृदय किंवा डायबिटीसचा ज्यांना धोका आहे, त्यांच्यासाठी हा एक सोपा आणि चांगली उपाय आहे.

Web Title : स्वस्थ हृदय: सही समय पर करें रात का भोजन, गंभीर बीमारियों से बचें!

Web Summary : सोने से तीन घंटे पहले रात का भोजन करने से हृदय स्वास्थ्य बेहतर होता है। एक अध्ययन में भोजन के समय को शरीर की जैविक घड़ी के साथ मिलाने से रक्तचाप, हृदय गति कम हुई और रक्त शर्करा नियंत्रण बेहतर हुआ। यह सरल बदलाव मध्यम आयु वर्ग और वृद्ध वयस्कों के लिए फायदेमंद है, खासकर हृदय रोग या मधुमेह के खतरे वाले लोगों के लिए।

Web Title : Healthy Heart: Time Your Dinner Right, Avoid Serious Illnesses!

Web Summary : Eating dinner three hours before bed improves heart health. A study showed lower blood pressure, heart rate, and better blood sugar control by aligning meal times with the body's biological clock. This simple change benefits middle-aged and older adults, especially those at risk of heart disease or diabetes.