Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तुमच्या घोट्यावरची सूज सांगते हार्टचं बिघडलेलं तंत्र, पायावर ही लक्षणं दिसत असतील तर लगेच डॉक्टरकडे जा..

तुमच्या घोट्यावरची सूज सांगते हार्टचं बिघडलेलं तंत्र, पायावर ही लक्षणं दिसत असतील तर लगेच डॉक्टरकडे जा..

Symptoms Of Heart Failure : दिवसभर उभे राहिल्याने, जास्त चालल्याने किंवा थकव्यानंतर पायांवर सूज येणं कॉमन मानलं जातं. पण प्रत्येक वेळी ही सूज कॉमन नसते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 14:57 IST2026-03-17T11:14:11+5:302026-03-17T14:57:58+5:30

Symptoms Of Heart Failure : दिवसभर उभे राहिल्याने, जास्त चालल्याने किंवा थकव्यानंतर पायांवर सूज येणं कॉमन मानलं जातं. पण प्रत्येक वेळी ही सूज कॉमन नसते.

Heart Health : The first symptoms of heart failure appear in the legs | तुमच्या घोट्यावरची सूज सांगते हार्टचं बिघडलेलं तंत्र, पायावर ही लक्षणं दिसत असतील तर लगेच डॉक्टरकडे जा..

तुमच्या घोट्यावरची सूज सांगते हार्टचं बिघडलेलं तंत्र, पायावर ही लक्षणं दिसत असतील तर लगेच डॉक्टरकडे जा..

Symptoms Of Heart Failure : नेहमीच शरीरात वेगवेगळ्या समस्यांची लक्षणं बघायला मिळतं. शरीरात काहीही गडबड झाली तर शरीर त्याचे संकेत आपल्याला देत असतं, पण सामान्यपणे जास्तीत जास्त लोक यांकडे दुर्लक्ष करतात. बऱ्याचदा शरीराच्या काही भागांमध्ये सूज बघायला मिळते. जसे की, पायांवर किंवा घोट्यांवर सूज येते. काही दिवसात ही सूज जाईल म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. दिवसभर उभे राहिल्याने, जास्त चालल्याने किंवा थकव्यानंतर पायांवर सूज येणं कॉमन मानलं जातं. पण प्रत्येक वेळी ही सूज कॉमन नसते. काही केसेसमध्ये घोट्यांवरील सूज हृदयासंबंधी गंभीर समस्या किंवा हार्ट फेल्युअरचं सुरूवातीचं लक्षण असू शकते.

घोट्यांवर का येते सूज? 

घोट्यांवर किंवा पायांवर येणाऱ्या सूजेला एडिमा म्हटलं जातं. जेव्हा शरीरात अतिरिक्त तरल पदार्थ जमा होऊ लागतात, तेव्हा ही सूज दिसू लागतात. हार्ट फेल्युअरच्या स्थितीमध्ये हृदय शरीरात रक्त योग्यपणे पंप करू शकत नाही. त्यामुळे शरीराच्या खालच्या भागात तरल पदार्थ जमा होऊ लागतात, ज्यामुळे घोट्यांवर आणि पायांवर सूज दिसू लागते. अनेकदा ही सूज हळूहळू वाढते आणि लोकांना सुरूवातीला याची फार जाणीव होत नाही. त्यामुळे डॉक्टर सल्ला देतात की, जर घोट्यांवर पुन्हा पुन्हा सूज दिसेल, तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. 

 इतर संकेत 

घोट्यांवर सूज सोबतच आणखी काही लक्षणंही दिसू लागतात. जसे की, लवकर थकवा जाणवणे, श्वास घेण्यास समस्या, पायऱ्या चढताना जास्त थकवा किंवा रात्री झोपताना श्वास भरून येणे. काही लोकांना पोटात जडपणा किंवा वजन अचानक वाढणे अशाही समस्या जाणवतात. जर या लक्षणांना वेळीच ओळखलं तर उपचार घेणं सोपं जातं आणि स्थितीत गंभीर होण्याआधी कंट्रोल करता येऊ शकते. 

कुणी रहावं जास्त सावध? 

ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, लठ्ठपणा किंवा हृदयासंबंधी आधीच काही आजार असेल, तर अशाप्रकारच्या लक्षणांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कारण वाढत्या वयात हृदयासंबंधी आजारांचा धोका जास्त वाढतो. डॉक्टरांचं मत आहे की, हेल्दी लाइफस्टाईल, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी तपासण्या करणं हृदय निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

Web Title : हार्ट फेलियर के लक्षण सबसे पहले पैरों में दिखते हैं: समय पर पहचानें।

Web Summary : पैरों और टखनों में सूजन हार्ट फेलियर का संकेत हो सकता है। लगातार सूजन को अनदेखा न करें, खासकर थकान या सांस फूलने के साथ। शीघ्र पता लगने से समय पर इलाज संभव है और गंभीर जटिलताओं से बचा जा सकता है। उच्च जोखिम वाले व्यक्तियों को अतिरिक्त सावधानी बरतनी चाहिए।

Web Title : Heart failure symptoms first appear in legs: Recognize early, avoid risk.

Web Summary : Swelling in feet, ankles can signal heart failure. Don't ignore persistent swelling, especially with fatigue or breathlessness. Early detection enables timely treatment and prevents severe complications. High-risk individuals should be extra cautious.