Join us

Heart diseases : 'हा' ब्लड ग्रुप असलेल्यांना कमी वयातच उद्भवतात हृदयाचे जीवघेणे आजार; समोर आलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 13:24 IST

Heart diseases : संशोधकांच्या म्हणण्यानुसार  एबी रक्तगट असलेल्यांमध्ये कार्डिओवॅस्क्यूलर डिसीज होण्याचा धोका जास्त असतो. त्यात ए आणि बी रक्तगटात तुलनेने कमी एंटीबॉडी असतात. 

व्यक्तीचं रक्त त्याच्या शरीराबाबत अनेक गोष्टींचा खुलासा करते. न्युट्रिशनल सायकायट्रिस्ट डॉ. शेल्डन जॅबले यांनी सांगितले की, ए, बी, एबी आणि ओ रक्तगटाशी काही खास एंटीबॉडीज जोडलेल्या असतात.  ए आणि बी या रक्त वाहिन्यांच्या पृष्ठभागावर  वेगळ्या प्रकारच्या एंटीबॉडीज असतात. एबी रक्तगटात  दोन्ही प्रकारच्या एंटीबॉडीज दिसून येतात. ओ रक्त गटाच्या पृष्ठभागावर कोणतीही एंटीबॉडी दिसून येत नाही. 

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एंटीबॉडी रक्त वाहिन्यांच्या पृष्ठभागावर एक असा चिकट पदार्थ असतो जो बाहेरून येत असलेल्या व्हायरल, बॅक्टेरिया आणि पॅरासाईट्सपासून शरीराचा बचाव करतो. जेनिटिसिस्ट एंड लीट प्रोडक्ट डेवलपमेंट साइंटिस्ट जॅम लिम सांगतात की,  नॉन ओ रक्तगट म्हणजेच ए, बी, आणि एबी  रक्तगट असलेल्यांमध्ये हृदयाशी निगडीत आजार उद्भवण्याचा धोका जास्त असतो. यामागचं खरं कारण समोर आलेलं नाही पण काही लोक ब्लड क्लॉटींग किंवा थ्रोम्बॉसिसला याचं कारण समजतात.

डॉ. जॅबलो यांच्या म्हणण्यानुसार ए, बी किंवा एबी रक्तगटाच्या लाल रक्तपेशी ज्या रक्त वाहिन्यांपासून तयार झालेल्या असतात त्या चिकट असल्यामुळे त्यात रक्त प्रवाह व्यवस्थित होत नाही. संशोधकांच्या म्हणण्यानुसार  एबी रक्तगट असलेल्यांमध्ये कार्डिओवॅस्क्यूलर डिसीज होण्याचा धोका जास्त असतो. त्यात ए आणि बी रक्तगटात तुलनेने कमी एंटीबॉडी असतात. 

अभ्यासानुसार ए आणि बी रक्त गटातील लोकांच्या नसांमध्ये रक्त गोठण्याची शक्यता  ५१ टक्के असते.   त्यांच्या फुफ्फुसांमध्ये रक्त गोठण्याची शक्यता ४७ टक्के असते. मेमोरिअल केअरमधील कार्डिओलॉजिस्ट होआंह पी गुयेन यांनी सांगितले की, टाईप ए रक्त गटात हृदयाच्या आजारांचा धोका ६ टक्के तर टाईप बी मध्ये १५ टक्के आणि एबी रक्तगटात २३ टक्के धोका असतो. 

चारचौघात ब्रा स्ट्रिप्स दिसल्या तर अवघडल्यासारखं होतं? 'या' ४ स्मार्ट ट्रिक्स वापरून ब्रा स्ट्रिप्स लपवा

तज्ज्ञांच्या  म्हणण्यानुसार नॉन टाईप ओ रक्त गटामध्ये हृदयाच्या आजारांच्या धोक्यामधील कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. रक्तात वॉन विलेब्रांड फॅक्टर लेव्हल, कॉलेस्ट्रॉल लेव्हल आणि जास्त ब्लड क्लॉटची शक्यता दर्शवते. ओ रक्त गटात  वॉन विलेब्रांड फॅक्टरचा स्तर कमी असतो. 

अचानक निपल्स दुखतात, तर कधी खाज येते? सांगता न येणारा हा त्रास टाळण्यासाठी हे घ्या उपाय

दरम्यान डॉ. जॅबलो सांगतात की, ''रक्त गोठण्याची काही इतर कारणंही असू शकतात.  डिहायड्रेशन, औषधं, ऑटो इम्यून आजार सुद्धा हृदयाच्या आजाराची जोखिम वाढवू  शकतात.  म्हणूनच ब्लड टाईप लठ्ठपणाा, व्हिटामीन्सची कमतरता त्याचप्रमाणे कार्डिओवॅसक्यूलर आजार वाढण्याचं कारण आहे. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहृदयविकाराचा झटकाहृदयरोग