Join us

रोजच्या 'या' छोट्या सवयींमुळे होतं हृदयाचं मोठं नुकसान, दवाखान्याची बिलं भरण्याची येते वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:49 IST

Heart Disease Cause : केवळ धुम्रपान केल्यानं, व्यायाम न केल्यानं किंवा अनहेल्दी फूड खाल्ल्यानंच हृदयरोग होतो असं नाही. तर आपली एक सवयीही याला कारणीभूत असते.

Heart Disease Cause : जगभरात हृदयरोगांच्या केसेस झपाट्यानं वाढत आहेत. हृदय हे आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाचं अवयव आहे. म्हणजे जर हृदय बंद पडलं तर व्यक्ती हे जग सोडून जाते. अशात जगायचं असेल आणि निरोगी रहायचं असेल तर दिवसरात्र आपल्यासाठी काम करणाऱ्या हृदयाची देखील काळजी घेणं तेवढंच महत्वाचं ठरतं. हृदयरोग होण्याची कारणं वेगवेगळी असतात. जसे की, सुस्त लाइफस्टाईल, चुकीचं खाणं-पिणं, लठ्ठपणा, तणाव, हाय बीपी, हाय कोलेस्टेरॉल, धुम्रपान, डायबिटीस ही हृदयरोगाची मुख्य कारणे सांगता येतील. याशिवाय आणखी एक अशी सवय आहे जी आपल्याला हृदयरोग देते. ती सवय म्हणजे झोप.

झोप आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची असते. कारण शरीर हे एका मशीनसारखं काम करतं. अशात ही मशीन झोपेत स्वत:ला रिपेअर करत असते. रोज रात्री पुरेशी आणि चांगल्या क्वालिटीची झोप न घेतल्यास वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. ज्यात हृदयासंबंधी आजारांचा देखील धोका आहे. 

हृदयासाठी झोप गरजेची

हृदय निरोगी ठेवायचं म्हटलं की, जास्तीत जास्त लोकांना हेच वाटतं की, हेल्दी डाएट घ्यावी आणि नियमितपणे व्यायाम करावा. झोपेकडे दुर्लक्षच केलं जातं. पण अनेकांना हे माहीत नाही की, हृदय हेल्दी ठेवण्यासाठी झोप खूप महत्वाची ठरते. 

वाढतो हृदयरोगाचा धोका

कार्डियोवस्कुलर डिजीज आणि त्यासंबंधी धोक्यांवर करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये आढळून आलं की, झोपेसंबंधी सवयी मुळात हृदयरोगाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतात. शोधात जवळपास २ हजार वयस्कांच्या झोपेचा कालावधी आणि गुणवत्ता मोजण्यात आली. यात आढळून आलं की, या दोन्ही गोष्टींचा प्रभाव हृदयाच्या आरोग्यावर पडतो.

जर्नल ऑफ अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये प्रकाशित या रिसर्चनुसार, ज्या लोकांच्या झोपण्याचा कालावधी सात तासांपेक्षा कमी होता, त्यांच्यात झोप न लागण्याची समस्या, दुपारी जास्त झोप येणे आणि स्लीप अॅपनियासारख्या समस्यांचा धोका अधिक होता. इतकंच नाही तर कमी झोप घेणाऱ्यांमध्ये ओव्हरवेट, टाइप २ डायबिटीस आणि हाय बीपीचा दरही अधिक आढळून आला. यावरून हे दिसून येतं की, पुरेशी आणि चांगली झोप घेत नसाल तर हृदयरोगाचा धोका वाढतो.

किती झोप महत्वाची?

सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अ‍ॅन्ड प्रीव्हेंशनच्या रिपोर्टनुसार, सगळ्यांनीच पुरेशी झोप घ्यावी. कारण झोपेत शरीराला स्वत:ला रिपेअर करण्यास मदत मिळते. सोबतच पुरेशी झोप घेतली तर दिवसभर काम करण्यासाठी एनर्जी मिळते. एक किंवा दोन दिवस झोप कमी झाली तर ठीक. पण नेहमीच कमी झोपत असाल तर गंभीर आजार होऊ शकतात. वयस्कांनी रोज रात्री कमीत कमी ७ तासांची झोप घ्यावीच घ्यावी.

टॅग्स : आरोग्यहृदयरोगहेल्थ टिप्स