Join us
Daily Top 2 Weekly Top 5

दातांवर पिवळे थर-तोंडाला दुर्गंध? ‘या’ घरगुती पदार्थांनी दात घासा- दातांची दुखणी होतील कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 16:56 IST

Natural Homemade Toothpaste For Teeth Cavity : पेरूच्या पानांमध्ये एंटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. हे दातांमध्ये साचलेले जंतू नष्ट करण्यास मदत करतात.

ओरल हेल्थ (Oral Health) आपल्या दिनचर्येचा एक महत्वाचा भाग आहे. तोंडाची स्वच्छता वेळीच न केल्यास तब्येतीच्या बऱ्याच समस्या उद्भवू शकतात. जिभेची स्वच्छता आणि ऑईल पुलिंग यासाठी महत्वाचे आहे. आजकालच्या काळात लोक स्वच्छतेसाठी केमिकल्सयुक्त टुथपेस्टवर अवलंबून राहू लागले आहेत. (Best Homemade Toothpaste)

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही घरच्याघरी नॅच्युरल टुथपेस्ट तयार करू शकता. आयुर्वेदात जांभळासारख्या काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून तुम्ही टुथपेस्ट तयार करू शकता. ज्यामुळे फक्त दात स्वच्छ होत नाही तर दातांना पोषणही मिळते. (Healthy Life Natural Homemade Toothpaste For Teeth Cavity Remedies)

घरच्याघरी करा टुथपेस्ट

जांभळाच्या बिया आणि पानं उन्हात सुकवून बारीक पावडर बनवून घ्या. ही पावडर लवंगाची पावडर, त्रिफळा चूर्ण किंवा सैंधव मिठात मिसळा. हे सर्व पदार्थ काचेच्या बरणीत ठेवा. रोज सकाळी बोटांच्या साहाय्यानं ही पावडर दात आणि हिरड्यांवर लावा.

२ मिनिट दातांना मसाज केल्यानंतर गुळण्या करून तोंड व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. काही आठवड्यानंतर दातांवर चांगला परिणाम दिसू लागेल. ही पावडर फक्त दातांची हरवलेली चमक परत आणत नाही तर सूज आणि  दातांतून रक्त येण्याची समस्याही कमी करते तसंच दांना लागलेली किड घालवण्यातही फायदेशीर ठरते.

घरगुती टुथपेस्ट का फायद्याची

 रिसर्चनुसार जांभळाच्या बियांमध्ये एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे दातांची किड आणि संक्रमणापासून बचाव करण्यास मदत होते. जांभळाची पानं पिवळेपणा दूर करतात. जर दातांमध्ये पायरिया असेल तर ही पावडर काही वेळ दातांवर लावलेली राहू द्या. लवंग दातांची मुळं मजबूत करते आणि मीठ संक्रमण पसरण्यापासून रोखते. (Ref)

पेरूची पानं

पेरूच्या पानांमध्ये एंटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. हे दातांमध्ये साचलेले जंतू नष्ट करण्यास मदत करतात. पेरूची ताजी पानं स्वच्छ नीट धुवून थेट चावून खा किंवा ही पानं पाण्यात उकळवून त्या काढ्यानं गुळण्या करा.

तुरटीचे पाणी

तुरटीमध्ये नैसर्गिक एंटी बॅक्टेरिअल घटक असतात जे दातांना लागलेली किड परसण्यापासून रोखतात. तुरटीची पावडर कोमट पाण्यात मिसळून त्या पाण्यानं दिवसातून दोनवेळा चूळ भरा. यामुळे दातांमधील घाण बाहेर पडण्यास मदत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Homemade remedies to remove tooth decay naturally and quickly.

Web Summary : Fight tooth decay with natural homemade toothpaste using ingredients like Java plum seeds, guava leaves, and alum. These remedies offer antibacterial properties, reduce inflammation, and strengthen gums, promoting better oral health.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य