Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कंबर खूपच दुखते-गुडघे ठणकतात? थंडीत रोज १ लाडू खा- हाडं मजबूत होतील, सोपी रेसिपी

कंबर खूपच दुखते-गुडघे ठणकतात? थंडीत रोज १ लाडू खा- हाडं मजबूत होतील, सोपी रेसिपी

Healthy Laddu Recipe For Winter : खाण्यात कॅल्शियम, व्हिटामीन डी नं परीपूर्ण अशा पदार्थांचा समावेश करायला हवा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 14:45 IST2025-01-07T13:10:01+5:302025-01-07T14:45:33+5:30

Healthy Laddu Recipe For Winter : खाण्यात कॅल्शियम, व्हिटामीन डी नं परीपूर्ण अशा पदार्थांचा समावेश करायला हवा.

Healthy Laddu Recipe For Winter To Reduce Joint Pain Keep Body Warm Boost Immunity Know How To Make Laddu | कंबर खूपच दुखते-गुडघे ठणकतात? थंडीत रोज १ लाडू खा- हाडं मजबूत होतील, सोपी रेसिपी

कंबर खूपच दुखते-गुडघे ठणकतात? थंडीत रोज १ लाडू खा- हाडं मजबूत होतील, सोपी रेसिपी

हिवाळ्याच्या (Winter Care Tips) दिवसांत सांधेदुखीची समस्या सर्वाधिक उद्भवते. सांधेदुखीच्या वेदना, गुडघ्यांमधील वेदना यामुळे लोकांचे त्रास अधिकच वाढत जातात.खाणंपिणं व्यवस्थित नसेल तर लोकांच्या  शरीरात व्हिटामीन डी आणि कॅल्शियमची कमतरता भासते. अशा स्थितीत व्हिटामीन डी च्या सप्लिमेंट्स घेत राहायला हव्यात किंवा खाण्यात कॅल्शियम, व्हिटामीन डी नं परीपूर्ण अशा पदार्थांचा समावेश करायला हवा. (Healthy Laddu Recipe For Winter To Reduce Joint Pain Keep Body Warm Boost Immunity Know )

जर तुमच्या हाडांमधून कटकट असा आवाज येत असेल तर तुम्ही थंडीच्या दिवसांत देशी लाडू बनवून खाऊ शकता. अळशी पावडर, मेथी पावडरपासून तयार केलेले हे लाडू पौष्टीक असून अनेक समस्यांपासूनही या लाडूंच्या सेवनानं आराम मिळतो. या लाडूंची रेसिपी फेसबुक अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे.

हिवाळ्यात  पौष्टीक लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

१) गूळ- ३ कप 

२) तूप -१ कप

३) गव्हाचं पीठ -१ कप

४) मेथी पावडर - २ मोठे चमचे

५) अळशी पावडर - २ कप

६) सुकं नारळ- अर्धा कप

७) खसखस - २ मोठे चमचे

८) वेलची पावडर - अर्धा चमचा

९) बदाम-काजू- अर्धा कप कापलेले बदाम

१०) सुंठ पावडर- १ चमचा

सगळ्यात आधी एका तव्यावर मेथी आणि आळशीच्या बीया भाजून घ्या नंतर थंड करून  मिक्सरमध्ये वाटून ही पावडर घाला. नंतर एका कढईमध्ये तूप घालून गरम करा. त्यात पीठ घालून ते गोल्डन ब्राऊन होऊ द्या. पीठ जळणार  नाही याची काळजी घ्या. अन्यथा लाडूची चव बिघडेल. नंतर हे साहित्य बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर एका दुसऱ्या भांड्यात थोडं पाणी घालून त्यात गूळ घाला नंतर व्यवस्थित वितळवून घ्या. मंद आचेवर  ठेवा. गुळ वितळल्यानंतर गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या.

मेथी, आळशीची पावडर, खसखस, कापलेले ड्राय फ्रुट्स, सुंठ पावडर, नारळ, वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करू घ्या.  यात हळूहळू गूळ घालून हातांनी एकजीव करा. हे मिश्रण हातांनी लाडूप्रमाणे गोल-गोल बनवून  घ्या. नंतर तुम्ही यात तूप मिसळू  शकता.  या लाडूंना गोल गोल लाडूंचा आकार द्या. प्लेटमध्ये ठेवून १ ते २ तासांसाठी तसंच ठेवून द्या. नंतर हे लाडू एका बंद डब्यात ठेवा. हे हेल्दी, टेस्टी, पौष्टीक लाडू २ ते ३ आठवडे खाऊ शकता. 

हे पौष्टीक लाडू खाण्याचे फायदे

हे लाडू खाल्ल्यानं तुम्हाला भरपूर फायबर्स मिळतील. पचायला हलके आहेत. मेथी, अळशी, गूळ, सुंठ शरीराला आतून गरम ठेवतील. गुळ शरीराला आयर्न आणि एनर्जी देईल. सकाळी १ लाडू खा किंवा रात्री झोपण्याआधी १ ग्लास गरम दुधासोबत हे लाडू खा. ज्या लोकांना हाडांच्या समस्या आहेत. त्यांनी हे लाडू भरपूर खायला हवेत. ज्यामुळे इम्यूनिटी स्ट्राँग होईल आणि तुम्हाला सिजनल आजार होणार नाहीत.

Web Title: Healthy Laddu Recipe For Winter To Reduce Joint Pain Keep Body Warm Boost Immunity Know How To Make Laddu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.