सध्या धावपळीच्या आणि सततच्या बदलत्या लाईफस्टाईलमध्ये, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणं ही फारच कॉमन गोष्ट झाली आहे. हेल्दी राहण्यासाठी आपण अनेकदा पॅक्ड फूड, डाएट स्नॅक्स किंवा “हेल्दी” म्हणून मार्केटमध्ये मिळणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करतो. पण हेच पदार्थ कधी कधी आपल्या किडनीसाठी घातक ठरू शकतात, हे आपल्यापैकी अनेकांना माहितच नसतं...आजकाल बाजारपेठेत अनेक प्रकारचे पॅकबंद पदार्थ आणि डाएट प्रॉडक्ट्स अगदी सहज उपलब्ध होतात, जे आपण आरोग्यासाठी अगदी फायदेशीर समजून खातो. पण हे हेल्दी दिसणारे पदार्थ आपल्या किडनीसाठी अत्यंत घातक ठरू शकतात(healthy foods that cause kidney stones).
नुकतेच किडनी स्टोनच्या (foods to avoid for kidney stones) समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहेत आणि यामागे आपल्या बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयी मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत. जास्त प्रमाणात मीठ, साखर आणि प्रिझर्व्हेटिव्ह असलेले पदार्थ शरीरात साचून किडनीवर ताण आणतात आणि स्टोन तयार (kidney stone causes food habits) होण्याचा धोका वाढवतात. यासाठीच, आपण नेमकं काय खातो आणि त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
किडनी स्टोन होण्याची प्रमुख कारणं नेमकी कोणती ?
मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉ. विक्रम बत्रा (डायरेक्टर आणि हेड, युरोलॉजी व किडनी ट्रान्सप्लांट) यांनी सांगितले की, सध्या किडनी स्टोन होण्याच प्रमाण झपाट्याने वाढत आहेत आणि याचे मुख्य कारण म्हणजे आपली बदललेली खाण्यापिण्याची पद्धत. अनेकदा आपण न विचार करता असे पदार्थ खातो ज्यात मीठ, साखर आणि प्रिजर्व्हेटिव्ह्जचे प्रमाण जास्त असते. या गोष्टी हळूहळू शरीरात जमा होतात आणि किडनी स्टोन बनण्याचे कारण ठरतात. म्हणूनच, आपण नेमक्या कोणत्या चुका करत आहोत आणि ही समस्या टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, याबद्दल डॉक्टरांनी आवश्यक माहिती दिली आहे.
कंबरेचे माप २८ व्हावे असे वाटते? पण जिमचं नको आणि डाएटिंगही नको, मग रोज १५ मिनिटं करा ३ उपाय...
मुलं १० वर्षांची होण्याआधीच लावा 'या' १० सवयी! आयुष्यभर पाळतील शिस्त , होतील जबाबदार...
किडनी स्टोन म्हणजे नेमकं काय ?
किडनी स्टोन हे खनिजांचे लहान आणि कडक कण असतात, जे किडनीमध्ये जमा होतात. जेव्हा लघवीमध्ये कॅल्शियम, ऑक्सलेट किंवा युरिक ॲसिड सारख्या घटकांचे प्रमाण वाढते आणि शरीरात पाण्याची कमतरता भासते, तेव्हा हे घटक एकत्र येऊन खड्याचे स्वरूप घेतात.
डाएट फूड सुद्धा किडनी स्टोनचे कारण कसे बनू शकतात?
१. मिठाचे अतिप्रमाण :- अनेक पॅकबंद आणि प्रोसेस्ड फूडमध्ये मिठाचे प्रमाण खूप जास्त असते. जर तुमच्या आहारात मिठाचे प्रमाण वाढले, तर शरीरातील कॅल्शियम लघवीवाटे जास्त प्रमाणात बाहेर पडू लागते. यामुळे किडनीमध्ये स्टोन तयार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.
२. साखर आणि सॉफ्ट ड्रिंक्स :- आजकल अनेकजण सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅकबंद ज्यूस मोठ्या प्रमाणात पितात. यामध्ये साखरेचे प्रमाण प्रचंड असते, जे शरीरात असे घटक वाढवतात जे स्टोन तयार होण्यास मदत करतात.
३. आहारात पोषक घटकांची कमतरता :- जर तुमच्या डाएटमध्ये फळे, भाज्या आणि कडधान्यांचे प्रमाण कमी असेल, तर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो. जेव्हा शरीराला पोटॅशिअम आणि सायट्रेट सारखे आवश्यक घटक मिळत नाहीत, तेव्हा किडनीमध्ये खडे तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते.
४. पाण्याची कमतरता :- अनेकांना दिवसभर पुरेसे पाणी न पिण्याची सवय असते, हे किडनी स्टोनचे सर्वात मोठे कारण आहे. शरीरात पाणी कमी असल्यास लघवी घट्ट होते, ज्यामुळे खनिजे एकत्र येऊन स्टोन बनण्याची शक्यता वाढते.
स्तनांचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी करा ५ उपाय! ओघळलेले स्तन होतील सुडौल फिगर...
स्वतःला लावा ५ चांगल्या सवयी...
१. बाहेरचे तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाण्याऐवजी जास्तीत जास्त घरचे ताजे अन्न खाण्यावर भर द्या.
२. आहारात मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवा आणि प्रक्रिया केलेले किंवा पॅकबंद पदार्थ खाणे टाळा.
३. कोल्ड ड्रिंक्स, पॅकबंद ज्यूस किंवा अतिप्रमाणात साखरेचे पदार्थ घेणे बंद करा.
४. दिवसातून किमान ४ लिटर पाणी पिण्याची सवय लावून घ्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
५. तुमच्या रोजच्या डाएटमध्ये ताज्या फळांचा आणि पालेभाज्यांचा आवर्जून समावेश करा.
'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका...
१. कंबर किंवा पोटाच्या बाजूला अचानक आणि खूप जोरात कळा येणे.
२. लघवी करताना रक्त पडणे किंवा लघवीचा रंग बदलणे.
३. पोटात दुखण्यासोबतच सतत मळमळणे किंवा उलट्या होणे.
४. लघवी करताना जळजळ होणे, थांबून थांबून लघवी होणे किंवा लघवीला अडथळा निर्माण होणे.
