आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वच्छतेसाठी आधुनिक साधनांचा वापर करतो, परंतु अनेकदा त्यांच्या वापराची योग्य पद्धत आपल्याला माहीत नसते. स्वच्छतागृहातील 'जेट स्प्रे' हे असेच एक साधन आहे. अनेक महिला स्वच्छतेच्या अतिरेकापोटी किंवा सोयीसाठी योनीमार्गावर (Vaginal area) थेट जेट स्प्रेचा जोरात मारा करतात, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
१. नैसर्गिक बॅक्टेरियांचा नाश (Ph Balance बिघडणे)
स्त्रीच्या योनीमार्गात नैसर्गिकरित्या 'लॅक्टोबॅसिलस' सारखे चांगले बॅक्टेरिया असतात, जे योनीचे इन्फेक्शनपासून संरक्षण करतात. जेट स्प्रेच्या जोराच्या पाण्यामुळे हे संरक्षक बॅक्टेरिया वाहून जातात. यामुळे तिथला नैसर्गिक pH बॅलन्स बिघडतो आणि योनीमार्ग कोरडा पडतो किंवा तिथे जंतूंचा संसर्ग सहज होतो.
२. पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज (PID) चा धोका
जर पाण्याचा दाब खूप जास्त असेल, तर ते पाणी योनीमार्गातून गर्भाशयाच्या ग्रीवेपर्यंत (Cervix) पोहोचू शकते. यामुळे बाहेरील बॅक्टेरिया शरीराच्या आत ढकलले जातात, ज्यामुळे गर्भाशयाला सूज येणे किंवा PID सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते.
३. नाजूक त्वचेला इजा आणि रॅशेस
योनीच्या आसपासची त्वचा अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असते. जेट स्प्रेचा पाण्याचा वेग जास्त असल्यास त्या त्वचेवर बारीक जखमा किंवा ओरखडे येऊ शकतात. यामुळे तिथे खाज सुटणे, जळजळ होणे किंवा लाल रॅशेस येण्याचा त्रास होऊ शकतो.
४. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI)
अनेकदा जेट स्प्रेचा अँगल चुकीचा असल्यास, गुदद्वाराकडील बॅक्टेरिया पाण्याचा दाबाने मूत्रमार्गाकडे (Urethra) ढकलले जातात. यामुळे महिलांमध्ये UTI म्हणजेच लघवीच्या जागी इन्फेक्शन होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
५. योनीमार्गाचा कोरडेपणा (Vaginal Dryness)
सतत जोरात पाणी मारल्यामुळे तिथल्या नैसर्गिक ओलाव्याचे प्रमाण कमी होते. यामुळे लैंगिक संबंधांच्या वेळी वेदना होणे किंवा सतत अस्वस्थ वाटणे अशा समस्या जाणवू शकतात.
सुरक्षित स्वच्छतेसाठी 'या' ४ गोष्टी लक्षात ठेवा:
१. पाण्याचा दाब कमी ठेवा: जेट स्प्रे वापरताना पाण्याचा वेग अत्यंत कमी ठेवावा. २. थेट मारा टाळा: पाणी थेट योनीमार्गाच्या छिद्रावर न मारता आसपासच्या भागावर मारावे. ३. पुसण्याची दिशा: नेहमी समोरून मागे (Front to Back) अशा दिशेने स्वच्छ करावे, जेणेकरून मागील भागातील बॅक्टेरिया पुढे येणार नाहीत. ४. कोरडे ठेवा: स्वच्छतेनंतर मऊ टॉवेल किंवा टिश्यू पेपरने तो भाग हलक्या हाताने टिपून कोरडा करावा. ओलसरपणामुळे फंगल इन्फेक्शन वाढू शकते.
Web Summary : Improper jet spray use can disrupt vaginal pH, causing infections, PID, UTIs, dryness, and rashes. Use low pressure, avoid direct contact, wipe front to back, and dry thoroughly for safe hygiene.
Web Summary : गलत जेट स्प्रे इस्तेमाल से योनि का पीएच बिगड़ सकता है, जिससे संक्रमण, पीआईडी, यूटीआई, सूखापन और चकत्ते हो सकते हैं। सुरक्षित स्वच्छता के लिए कम दबाव का उपयोग करें, सीधे संपर्क से बचें, आगे से पीछे की ओर पोंछें और अच्छी तरह सुखाएं।