Join us

दररोज अंघोळ केल्याने, साबण लावल्याने त्वचा खराब होते? नव्या रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 17:02 IST

चांगल्या आरोग्यासाठी दररोज अंघोळ करणं खूप महत्त्वाचं आहे.

अंघोळ करणं हा आपल्या सर्वांच्या डेली रुटीनचा एक भाग आहे. चांगल्या आरोग्यासाठी दररोज अंघोळ करणं खूप महत्त्वाचं आहे. काही लोकांना सकाळी लवकर अंघोळ केल्यानंतर ताजेतवानं वाटतं तर काही रात्री आंघोळ करून झोपतात. नॉटिंगहॅम विद्यापीठातील मेडिकल स्किन एक्सपर्ट् डॉ. रोजलिंड सिम्पसन यांनी द गार्डियनशी झालेल्या संभाषणात त्यांनी त्यांच्या एका अभ्यासाबद्दल माहिती दिली. ज्यामध्ये दररोज अंघोळ करण्याचे तोटे स्पष्ट केले आहेत.

डॉ. सिम्पसन म्हणाले की, पूर्वी दररोज अंघोळ करणं ही एक समस्या मानली जात असे. असं म्हटलं जात होतं की, वारंवार अंघोळ केल्याने त्वचेचं नैसर्गिक संतुलन बिघडू शकतं, ज्यामुळे संरक्षण करणारं आवश्यक असलेलं ऑईल आणि फायदेशीर बॅक्टेरिया नष्ट होतात. असंही म्हटलं जात होतं की, वारंवार अंघोळ केल्याने त्वचा कोरडी होऊ शकते, ज्यामुळे त्वचेला भेगा पडू शकतात. यामुळे हानिकारक बॅक्टेरिया आणि ऍलर्जीचा धोका वाढतो आणि इन्फेक्शन, एक्जिमा आणि सोरायसिस होऊ शकतात.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही जितका जास्त वेळ पाण्यात राहाल तितकी तुमची त्वचा कोरडी होऊ शकते, तुम्ही कितीही वेळा अंघोळ केली तरी. कमी वेळात थंड पाण्याने अंघोळ करणं चांगलं आहे. याव्यतिरिक्त त्यांनी मिथाइलिसोथियाज़ोलिनोन, मिथाइलक्लोरोइसोथियाज़ोलिनोन, सल्फेट्स और पॅराबेन्स  सारख्या घटकांची यादी देखील दिली, जे विषारी आहेत. हे टाळण्यासाठी साबणाऐवजी एमोलिएंट क्रीम वापरण्याचा सल्ला दिला आहे.

डॉ. सिम्पसन आणि त्यांच्या टीमने ४३८ एक्झिमा रुग्णांवर हा अभ्यास केला. त्यांनी द गार्डियनला सांगितलं की, अभ्यासात सहभागी लोकांना दोन गटांमध्ये विभागलं गेलं. एक जो दररोज अंघोळ करत असे आणि दुसरा जो आठवड्यातून काही वेळाच अंघोळ करत असे. या अभ्यासात असं आढळून आलं की, दोन्ही गटांमध्ये त्वचेच्या कोरडेपणा किंवा एक्झिमाच्या लक्षणांमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण फरक नव्हता. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य