हिवाळ्यात अनेक प्रकारचे आजार पसरतात. सर्दी, ताप आणि खोकला यासारख्या समस्या सामान्य आहेत. पण आजकाल जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिकेत तीन प्रकारच्या आजारांचा धोका जास्त दिसून येत आहे. बहुतेक लोक नोराव्हायरस, बर्ड फ्लू आणि कोरोना व्हायरसमुळे घाबरतात. रुग्णालयात रुग्णांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत.
हे सर्व आजार कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांवर अटॅक करतात आणि थंडीच्या काळात यापैकी काही आजारांचा धोका देखील वाढतो. हिवाळ्यात या तिघांपैकी कोणता आजार जास्त धोकादायक आहे आणि ते आजार कसे टाळायचे याबाबत जाणून घेऊया...
नोरोव्हायरस म्हणजे काय?
नोरोव्हायरस हे गॅस्ट्रोएन्टेरायटिसचे एक सामान्य कारण असू शकते. याला विंटर वोमिटिंग बग असेही म्हणतात. याचा परिणाम झाल्यानंतर, अतिसार, उलट्या आणि पोटदुखीसारख्या समस्या उद्भवतात. ताप आणि डोकेदुखी देखील कायम राहू शकते. साधारणपणे त्याची लक्षणं १२ ते ४८ तासांनंतर दिसून येतात. डिहायड्रेशनचा धोका असतो. सहसा हा व्हायरस ओरली पसरतो. हे दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे किंवा एका व्यक्तीच्या संपर्कातून पसरू शकतो. या आजारावरील उपचार त्याच्या लक्षणांवर आधारित आहे.
बर्ड फ्लू किती धोकादायक?
अमेरिकेत सध्या बर्ड फ्लू म्हणजेच एव्हियन इन्फ्लूएंझाचा धोका दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जानेवारी २००३ ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत, H5N1 (बर्ड फ्लू) च्या ८८७ प्रकरणांपैकी ४६२ जणांचा मृत्यू झाला. याचा अर्थ असा की ५२% लोक बर्ड फ्लूमुळे मरतात, जो कोविड-१९ पेक्षा जास्त प्राणघातक आहे, कारण सुरुवातीला कोरोनामुळे होणारा मृत्यूदर ०.१% पेक्षा कमी किंवा २०% पर्यंत होता. ताप, खोकला, उलट्या, अतिसार, डोकेदुखी, थकवा, अस्वस्थता, घसा खवखवणे, स्नायू दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही त्याची लक्षणे आहेत.
कोरोना
कोरोना व्हायरसचा धोका अमेरिकेसाठीही चिंतेचा विषय बनला आहे. यामध्ये ताप, थंडी वाजणे, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, घसा खवखवणे, नाक बंद होणे, वास किंवा चव न समजणे, थकवा, वेदना, डोकेदुखी, मळमळ किंवा उलट्या यासारख्या समस्या अनेक दिवस दिसून येतात. सुरुवातीला या व्हायरसची भीती खूप जास्त होती. लसीकरणानंतर मृत्युदरही कमी झाला.
आजारांपासून स्वतःचं संरक्षण कसं करावं?
- नोरोव्हायरस, बर्ड फ्लू किंवा कोरोना व्हायरस टाळण्यासाठी नियमितपणे साबणाने हात धुवा.
- या व्हायरसचा प्रसार झालेल्या भागात जाणे टाळा.
- संक्रमित रुग्णापासून अंतर ठेवा आणि त्यांना भेटल्यानंतर हात पूर्णपणे स्वच्छ करा.
- नोरोव्हायरसने संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या भाग पूर्णपणे स्वच्छ करा.
- उलट्या किंवा विष्ठेच्या संपर्कात आलेले कपडे गरम पाण्याने आणि डिटर्जंटने चांगले धुवा.
- दरवाजाचे हँडल, लाईट स्विचेस, काउंटरटॉप्स, मुलांची खेळणी आणि स्मार्टफोन सॅनिटायझरने पूर्णपणे स्वच्छ करा.
- तुमचे हात तुमच्या चेहऱ्यापासून दूर ठेवा.
- खोकताना किंवा शिंकताना तोंड टिश्यू पेपर किंवा रुमालाने झाका.
- जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी गेलात तर नक्कीच N95 किंवा मेडिकल-ग्रेड मास्क घाला.
- जर व्हायरससाठी लस असेल तर ती नक्कीच घ्या. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ खा.
- आजारी असताना घरीच राहा, आराम करा.
- नोरोव्हायरसवर कोणताही औषध नाही. अशा परिस्थितीत शक्य तितक पाणी प्या. शरीर हायड्रेटेड ठेवा.