ब्रिटनमध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार, कॉफीच सेवन मर्यादेत केल्यास मृत्यूचा धोका सुमारे १० वर्षांनी कमी होऊ शकतो. यामुळेही मूड फ्रेश होतो, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, थकवा दूर करण्यासाठी कॉफी फायदेशीर ठरू शकते परंतु ५ प्रकारच्या आजारांच्या बाबतीत कॉफी टाळणं उत्तम ठरेल. कारण या अशा परिस्थितीत कॉफी शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.
बरेच लोक सकाळी एनर्जीसाठी एक कप कॉफी घेऊन दिवसाची सुरुवात करतात. याचे अनेक फायदे आहेत. ब्रिटनमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, कॉफीचे सेवन मर्यादेत केल्यास मृत्यूचा धोका सुमारे १० वर्षांनी कमी होऊ शकतो. यामुळे मूडही फ्रेश होतो. कॉफीचे केवळ फायदेच नाहीत तर तोटे देखील आहेत.
ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ म्हणतात, दररोज ६ कप पेक्षा जास्त कॉफी थेट मेंदूवर परिणाम करू शकते. यामुळे डिमेंशियाचा धोका म्हणजेच स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका ५८% पर्यंत राहतो. तणाव देखील वाढू शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, थकवा दूर करण्यासाठी कॉफी फायदेशीर ठरू शकते परंतु ५ प्रकारचे आजार असल्यास तीच कॉफी काही प्रमाणात विष ठरू शकते.
तणाव आणि निद्रानाश
कॉफीमध्ये कॅफिन आढळतं, जे तणाव किंवा झोपेच्या समस्या असलेल्या रुग्णांसाठी हानिकारक असू शकतं. कॅफिन मज्जासंस्था सक्रिय करते आणि हृदयाचे ठोके वाढवते. त्यामुळे तणाव जाणवू शकतो. झोपण्यापूर्वी कॉफी प्यायल्याने निद्रानाश होऊ शकतो.
लोहाची कमतरता
शरीरात लोहाची कमतरता असल्यास चुकूनही कॉफी पिऊ नये. कॉफीमुळे लोह शोषण्यात अडथळा निर्माण होतो. विशेषतः जेव्हा ती एखाद्या पदार्थासोबत घेतली जाते. कॉफीमध्ये आढळणारे टॅनिन लोहाशी संबंधित आहे. शरीरात लोहाची कमतरता होऊ शकते.
गरोदरपणात कॉफी टाळा
गरोदरपणात कॉफी टाळा. याच दरम्यान कॅफिनपासून दूर राहा, कारण त्याचा मुलाच्या वाढीवर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. संशोधनात असे आढळून आले आहे की गर्भधारणेदरम्यान अतिरिक्त कॅफीनमुळे कमी वजनाचं बाळ आणि गर्भपाताचा धोका वाढू शकतो.
उच्च रक्तदाब
कॅफिनमुळे रक्तदाब लक्षणीय वाढू शकतो कारण ते हृदय आणि रक्तवाहिन्यांवर दबाव वाढवतं. जर एखाद्याला समस्या असेल आणि त्याने खूप कॉफी प्यायली असेल तर त्याचा धोका वाढू शकतो.
ऍसिड रिफ्लक्स
जर एखाद्याला ऍसिड रिफ्लक्स किंवा गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिजीज असेल आणि तो कॉफी पीत असेल तर त्याच्या समस्या वाढू शकतात. कॉफीमध्ये असलेले कॅफिन आणि ऍसिड पोटात ऍसिडचे उत्पादन वाढवून छातीत जळजळ आणि रिफ्लक्स कारण ठरू शकतात. यामुळे सूज आणि छातीत दुखणे यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.