Join us

अरे बापरे! उशिरा उठण्याची सवय पडू शकते महागात; लवकर व्हाल म्हातारे, आताच व्हा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:52 IST

आपल्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या सवयीमुळे लवकर म्हातारपण येऊ शकतं असं म्हटलं आहे. उशिरा उठणे आणि म्हातारपण यांचा काय संबंध आहे ते जाणून घेऊया...

आजकाल रात्री उशिरापर्यंत जागणं आणि सकाळी उशिरा उठणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. जर तुम्हालाही अशीच सवय असेल तर ती लगेचच बदला, कारण ही एक सवय तुम्हाला लवकर म्हातारं करू शकते. दररोज उशिरा उठल्याने तुमच्या वाढत्या वयावर वाईट परिणाम होऊ शकतो. एका रिसर्चमध्ये काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. आपल्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या सवयीमुळे लवकर म्हातारपण येऊ शकतं असं म्हटलं आहे. उशिरा उठणं आणि म्हातारपण यांचा काय संबंध आहे ते जाणून घेऊया...

उशिरा उठण्याचे तोटे

रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की, दररोज उशिरा उठणाऱ्यांच्या शरीराची सर्केडियन रिदम बिघडते. याचा थेट परिणाम शरीराच्या पेशींच्या पुनरुत्पादनावर, मेटाबॉलिज्मवर आणि मानसिक आरोग्यावर होतो. हे असंतुलन हळूहळू वृद्धत्वाची लक्षणं वाढवू शकतं.

उशिरा झोपल्यामुळे होणाऱ्या समस्या

- चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येणं.

- स्मृती कमी होणं.

- ताण आणि नैराश्य.

- रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणं.

- थकवा वाढतो आणि सुस्ती येते.

आरोग्य तज्ञ म्हणतात की, आपलं शरीर एका विशिष्ट जैविक वेळेनुसार कार्य करतं. सूर्य उगवतो आणि मावळतो तेव्हा शरीर मेलाटोनिन आणि कॉर्टिसोल सारखे हार्मोन्स रिलीज करतं, जे झोप आणि उर्जेची पातळी नियंत्रित करतात. जेव्हा आपण उशिरा झोपतो आणि उशिरा उठतो तेव्हा हे चक्र बिघडतं, ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान होते.

उशिरा उठणाऱ्या लोकांमध्ये वृद्धत्वाची लक्षणं का दिसतात?

रिसर्चनुसार, उशिरा उठणाऱ्या लोकांमध्ये इनफ्लेमेशन होण्याची लक्षणं जास्त आढळून आली, ज्यामुळे शरीरातील पेशींचं नुकसान होऊ शकतं. तसेच उशिरा उठणाऱ्यांमध्ये व्यायाम आणि शारीरिक हालचालींसाठी लागणारा वेळ कमी होतो, ज्यामुळे हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका देखील वाढतो.

लवकर उठण्याचे फायदे

- दिवसभर ऊर्जा टिकून राहते

- तुमची बुद्धी तल्लख होते.

- हार्मोनल संतुलन

- ताण आणि चिंता कमी होणं

- त्वचेचं आरोग्य सुधारतं

- रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य