Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Health Tips: ऑफिसमध्ये डुलकी लागण्यामागचं हे 'शास्त्रीय' कारण तुम्हाला माहीत आहे का?

Health Tips: ऑफिसमध्ये डुलकी लागण्यामागचं हे 'शास्त्रीय' कारण तुम्हाला माहीत आहे का?

Health Tips: लंचब्रेकनंतर शतपावली न करता जागेवरच बसून राहिलात तर डुलकी लागलीच समजा, पण असे का होते? विशेषतः उन्हाळ्यात? जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 15:29 IST2026-03-11T15:27:18+5:302026-03-11T15:29:10+5:30

Health Tips: लंचब्रेकनंतर शतपावली न करता जागेवरच बसून राहिलात तर डुलकी लागलीच समजा, पण असे का होते? विशेषतः उन्हाळ्यात? जाणून घेऊ!

Health Tips: Do you know this 'classical' reason for napping in the office? | Health Tips: ऑफिसमध्ये डुलकी लागण्यामागचं हे 'शास्त्रीय' कारण तुम्हाला माहीत आहे का?

Health Tips: ऑफिसमध्ये डुलकी लागण्यामागचं हे 'शास्त्रीय' कारण तुम्हाला माहीत आहे का?

उन्हाळा सुरू झाला की घामाच्या धारांसोबतच एक मोठी समस्या सतावू लागते, ती म्हणजे दुपारी जेवण झाल्यावर अनावर होणारी झोप! ऑफिस असो वा घर, दुपारी पेंगणारे डोळे उघडे ठेवणे कठीण होऊन बसते. वामकुक्षीची सवय असणाऱ्यांना झोप अनावर होतेच, पण विशेषतः उन्हाळ्यातच असं का होतं? यामागे केवळ आळस नसून काही शास्त्रीय कारणे आहेत, ती जाणून घेऊ. 

१. शरीराचे तापमान नियंत्रण (Thermoregulation)

उन्हाळ्यात बाहेरचे तापमान वाढलेले असते. आपल्या शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी (३७°C) शरीराला खूप कष्ट करावे लागतात. घामावाटे शरीर थंड ठेवण्याच्या या प्रक्रियेत खूप ऊर्जा खर्च होते, ज्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो आणि झोप येते.

२. रक्ताभिसरणात होणारा बदल

उष्णतेमुळे आपल्या रक्तवाहिन्या विस्तारतात (Vasodilation). यामुळे त्वचेकडे रक्ताचा प्रवाह वाढतो जेणेकरून उष्णता बाहेर टाकता येते. मात्र, यामुळे मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा आणि रक्तदाब किंचित कमी होतो, ज्यामुळे सुस्ती आणि डोळ्यावर झापड येते.

३. डिहायड्रेशन (Dehydration)

घामावाटे शरीरातील पाणी आणि मीठ (Electrolytes) बाहेर पडते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली की रक्ताचे प्रमाण कमी होते आणि हृदय अधिक जोराने काम करू लागते. या थकव्यामुळे शरीराला विश्रांतीची ओढ लागते.

४. जड जेवण आणि पचन

उन्हाळ्यात आपली पचनशक्ती काहीशी मंदावलेली असते. अशात जर दुपारी मसालेदार किंवा जड जेवण (उदा. भात किंवा तळलेले पदार्थ) घेतले, तर रक्ताचा जास्तीत जास्त ओघ पचनसंस्थेकडे वळतो. यामुळे मेंदूला मिळणारी ऊर्जा कमी होऊन झोप अनावर होते.

५. रात्रीची अपुरी झोप

उन्हाळ्यात उकाडा असतो, ज्यामुळे रात्री खूप उशिरापर्यंत झोप वारंवार मोडते किंवा शांत झोप लागत नाही. ही अपुरी झोप शरीर दुपारी भरून काढण्याचा प्रयत्न करते. त्यामुळेही पेंग येते. 

दुपारची झोप टाळण्यासाठी काही 'प्रो' टिप्स

हलका आहार: दुपारी पोटभर जेवण्याऐवजी हलका आणि पचायला सोपा आहार घ्या. आहारात ताक, दही किंवा कोशिंबिरीचा समावेश करा.

हायड्रेशन: दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या. लिंबू सरबत किंवा शहाळ्याचे पाणी घेतल्यास शरीरातील क्षारांचे प्रमाण टिकून राहते.

पाॅवर नॅप (Power Nap): जर शक्य असेल, तर दुपारी फक्त १० ते १५ मिनिटांची छोटी डुलकी घ्या. यामुळे मेंदू पुन्हा फ्रेश होतो. पण तासनतास झोपणे टाळा.

थंड पाण्याचा हबका: खूप झोप येत असल्यास तोंडावर थंड पाण्याचे हबके मारा किंवा हाता-पायांना थंड पाणी लावा.

Web Title : ऑफिस में नींद आने के वैज्ञानिक कारण जानिए।

Web Summary : गर्मी में नींद शरीर का तापमान नियंत्रण, रक्त प्रवाह में बदलाव, डिहाइड्रेशन, भारी भोजन और अपर्याप्त नींद के कारण आती है। हल्के भोजन, हाइड्रेशन और झपकी से मुकाबला करें।

Web Title : Why do you feel sleepy at the office? Scientific reasons.

Web Summary : Summer sleepiness stems from body temperature regulation, blood flow changes, dehydration, heavy meals, and insufficient sleep. Combat it with light meals, hydration, power naps, and cold water splashes.