Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > औषधं घेताना जास्तीत जास्त लोक करतात 'या' कॉमन चुका, त्या टाळल्या तरच मिळेल औषधांचा फायदा

औषधं घेताना जास्तीत जास्त लोक करतात 'या' कॉमन चुका, त्या टाळल्या तरच मिळेल औषधांचा फायदा

Health Tips : कोणतेही डॉक्टर रूग्णांना औषधं वेळेवर घेण्यासोबतच आहारावरही लक्ष देण्यास सांगतात. कारण आजारी असताना आपण जे खातो त्याचा आपल्या औषधांवरही प्रभाव पडत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 15:46 IST2026-01-23T11:42:37+5:302026-01-23T15:46:34+5:30

Health Tips : कोणतेही डॉक्टर रूग्णांना औषधं वेळेवर घेण्यासोबतच आहारावरही लक्ष देण्यास सांगतात. कारण आजारी असताना आपण जे खातो त्याचा आपल्या औषधांवरही प्रभाव पडत असतो.

Health Tips : Common mistakes people do while taking medicine | औषधं घेताना जास्तीत जास्त लोक करतात 'या' कॉमन चुका, त्या टाळल्या तरच मिळेल औषधांचा फायदा

औषधं घेताना जास्तीत जास्त लोक करतात 'या' कॉमन चुका, त्या टाळल्या तरच मिळेल औषधांचा फायदा

Health Tips : हल्ली आजारपण फारच कॉमन झालं आहे. सतत कोणत्या ना कोणत्या आजारांचा लोकांना सामना करावा लागतो. त्यामुळे महिलांच्या पर्समध्ये किंवा पुरूषांच्या बॅगमध्ये सर्रासपणे औषधं असतातच असतात. वेळोवेळी औषधं घ्यावी लागतात. पण गोष्टी जास्त बघायला मिळते की, औषधं घेताना जास्तीत जास्त लोक काही कॉमन चुका करतात. ज्यामुळे त्या औषधांचा हवा तसा प्रभाव बघायला मिळत नाही. कोणतेही डॉक्टर रूग्णांना औषधं वेळेवर घेण्यासोबतच आहारावरही लक्ष देण्यास सांगतात. कारण आजारी असताना आपण जे खातो त्याचा आपल्या औषधांवरही प्रभाव पडत असतो. अशात औषध घेताना कोणते पदार्थ किंवा पेय टाळले पाहिजे हेही डॉक्टर सांगतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आंबट फळं

जेव्हा आपण औषधं घेता, तेव्हा आंबट फळं खाऊ नये. आंबट फळं ५० पेक्षा अधिक औषधांना प्रभावित करू शकतात. याने शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या टाळण्यासाठी औषधं घेत असताना लिंबू, संत्री, द्राक्ष, लोणचं, चिंच खाऊ नका.

गरम चहा-कॉफीने नुकसान

औषधं गरम गोष्टींमुळे खराब होतात. औषधांचं कोटिंग आधीच गरम पाण्यासोबत नष्ट होतं आणि त्याचा योग्य तो फायदा तुम्हाला मिळत नाही. अशात आपण तुम्ही चहा-कॉफी किंवा कोणत्याही गरम पदार्थासोबत किंवा पेयासोबत औषध घेऊ नये. औषधं नॉर्मल पाण्यासोबतच घ्यावीत.

केळी कधी ठरतात घातक

आजारपणात अनेकदा बरेच लोक केळी खातात. केळींमध्ये असणारं पोटॅशिअम आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पण जर तुम्ही ब्लड प्रेशरची औषधे घेत असाल जसे की, कॅप्टोप्रिल, एंजियोटेनसिन इत्यादी, तर केळीसहीत इतरही पोटॅशिअम असलेली फळं किंवा पदार्थ खाऊ नये. याने हृदयाचे ठोके वाढू शकतात.

डेअरी प्रॉडक्ट्स

डेअरी उप्तादनं जसे की, दूध, पनीर, दही आणि मलाई सारखे पदार्थ तुमच्या शरीरात काही अॅंटीबायोटिक औषधांचा प्रभाव निकामी करू शकतात. दुधातील कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सारख्या खनिजांनी प्रोटीनसोबत काही रिअॅक्शन होतात. याने काही औषधांचा प्रभाव कमी होतो.

कोल्ड ड्रिंक्स

सोडा आणि कोल्ड ड्रिंक्ससोबत औषधे घेण्याची चूक अजिबात करू नका. अशात औषध तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.

Web Title : दवा लेते समय ये आम गलतियाँ करने से बचें, बेहतर परिणाम पाएँ।

Web Summary : कुछ खाद्य पदार्थों के साथ दवा लेने से उनका असर कम हो सकता है। खट्टे फल, गर्म पेय, केले (ब्लड प्रेशर की दवाओं के साथ), डेयरी और कोल्ड ड्रिंक से बचें। बेहतर परिणाम और स्वास्थ्य के लिए सामान्य पानी का उपयोग करें।

Web Title : Avoid these common mistakes while taking medicines for better results.

Web Summary : Taking medicines with certain foods can reduce their effectiveness. Avoid sour fruits, hot drinks, bananas (with blood pressure meds), dairy, and cold drinks. Stick to normal water for optimal results and better health.