Join us

१४ दिवस साखर खाणं सोडल्यास काय फरक पडेल, तुमच्या शरीरात किती होतील बदल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 15:07 IST

एका मर्यादेत साखरे खाणं ठीक आहे, परंतु जास्त प्रमाणात खाल्ल्याने मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. 

साखर ही आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. एका मर्यादेत साखरे खाणं ठीक आहे, परंतु जास्त प्रमाणात खाल्ल्याने मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. 

साखरेशिवाय आपण रोज जे काही खातो, त्यातही साखर आढळते, उदाहरणार्थ, कोल्ड्रिंक्स, कुकीज, बिस्किट आणि ब्रेडमध्येही साखर आढळते. WHO च्या मते, दिवसाला ५० ग्रॅमपेक्षा जास्त साखर धोकादायक असू शकते. अशा परिस्थितीत केवळ दोन आठवडे म्हणजेच १४ दिवस साखर खाल्ली नाही तर शरीराला किती फायदा होईल हे जाणून घेऊया...

जास्त साखर खाण्याचे दुष्परिणाम

- स्नायू आणि सांधे दुखणे

- अकाली वृद्धत्वाची चिन्ह

- जास्त खाण्याची इच्छा

- दातांमध्ये समस्या

- पोटात सूज येऊ शकते

- दिवसभरातील एनर्जी लेव्हलमध्ये बदल

- वजन वाढणे

- पुन्हा पुन्हा आजारी पडणे

- मूड स्विंग्स

पहिले ७ दिवस साखर सोडल्यानंतर शरीरातील बदल

आरोग्य तज्ञांच्या मते, साखर सोडणं इतकं सोपं नाही. त्यामुळे सुरुवातीचे दोन-तीन दिवस खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे डोकेदुखी, पोटदुखी, थकवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. हे देखील एक लक्षण आहे की, तुमचे शरीर साखरेशिवाय राहू शकतं. असं तीन दिवस केलंत तर चौथ्या दिवसापासून तुमचे शरीर पूर्णपणे ताजेतवानं वाटू लागतं. तुम्हाला खूप ऊर्जा जाणवेल. शुगर लेव्हल नियंत्रणात राहील.

८ ते १४ दिवसांत काय होईल?

सात दिवसांनंतरही साखर खाल्ली नाही तर पचनक्रिया सुधारण्यास सुरुवात होते. यामुळे बद्धकोष्ठता, सूज येणे आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. त्यामुळे भूक कमी होऊन झोप चांगली लागते. यानंतर साखर खाण्याची इच्छा कमी होऊ लागते. झोपेशी संबंधित समस्याही दूर होऊ शकतात.

दररोज किती साखर खावी?

अमेरिकन हार्ट असोसिएशनने सल्ला दिला आहे की, पुरुषांनी दिवसातून १५० कॅलरीज म्हणजे जवळपास ३६ ग्रॅमहून जास्त साखर खाऊ नये, तर महिलांसाठी हे प्रमाण १०० कॅलरीज म्हणजे २४ ग्रॅम आहे. यापेक्षा जास्त साखर हानिकारक असू शकते.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स