Health Tips : तब्येत चांगली ठेवण्यासाठी आणि वेगवेगळे आजार टाळण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. पौष्टिक आहार घेतात आणि नियमितपणे व्यायाम करतात. पण अनेकदा आपलं शरीर आपल्या काय सांगू पाहत आहे, त्याकडे लक्षच दिलं जात नाही. जास्तीत जास्त लोक शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे पुढे जाऊन गंभीर समस्या होतात.
असं म्हणायला जर विचित्र वाटू शकतं. पण आपलं शरीर काही संकेतांच्या माध्यमातून आपल्यासोबत काहीतरी बोलत असतं. शरीर सांगत असतं की, तुम्ही आता आराम करायला हवा आणि कधी त्याला पोषणाची गरज आहे. जर हे संकेत ओळखणं तुम्ही शिकलात, तर अनेक आजारांचा धोका टाळून एक हेल्दी जीवन जगू शकता.
ब्रेन फॉग
तुम्हाला जर गोष्टी लक्षात ठेवण्यास समस्या होत असेल, लक्ष केंद्रीत करता येत नसेल आणि कामावर फोकस करू शकत नसाल तर याला 'ब्रेन फॉग' म्हणतात. या समस्या खराब झोप, ब्लड शुगर असंतुलन आणि स्ट्रेस हार्मोन कार्टिसोल वाढल्याचं कारण असू शकतात.
काय कराल उपाय?
सकाळी उन्हात बसा. आपल्या आहारात प्रोटीन आणि हेल्दी फॅटचा समावेश करा. रात्री झोपण्याआधी मोबाइल आणि लॅपटॉप बघणं टाळा.
८ तास झोपूनही थकवा
जर तुम्ही रात्री ८ वाजता पुरेशी झोप घेतल्यावरही सकाळी जर थकवा जाणवत असेल, तर ही बाब सामान्य नाही. याचा हा अर्थ होतो की, तुमचं शरीर योग्यपणे रिकव्हर होत नाहीये. रात्री कार्टिसोल लेव्हल वाढल्यानं आणि मेलाटोनिन कमी झाल्यानं झोपेत अडथळा निर्माण होतो.
काय कराल उपाय?
रात्री झोपतेवेळी घरातील लाइट डिम करा. झोपायच्या २ तासआधी जेवण करा. मोबाइल-टिव्ही बघू नका.
सकाळी भूक न लागणे
जर तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यावर भूक लागत नसेल तर हा एक संकेत आहे की, नर्व्हस सिस्टीम स्ट्रेसमध्ये आहे. वाढलेल्या कार्टिसोलमुळे भूक कमी लागते.
काय कराल उपाय?
सकाळी नियमितपणे हलका व्यायाम करा. नाश्ता करण्याआधी कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्या.
हात-पाय थंड पडणे
जर तुमचे हात आणि पाय नेहमीच थंड राहत असतील, तर हा थायरॉइड हार्मोनचं कमी उत्पादन आणि मेटाबॉलिज्म स्लो झाल्याचा संकेत असू शकतो.
काय कराल उपाय?
नेहमीच पौष्टिक आहार घ्या. जेवण स्किप करू नका. आहारात आयोडिन, सेलेनिअम आणि झिंकसारखे पोषक तत्व असायला हवेत. यांनी थायरॉइडच्या फंक्शनला सपोर्ट मिळेल.
मूडमध्ये सतत बदल
जर तुम्हाला नेहमीच निराश वाटत असेल किंवा कोणत्याही कामात लक्ष लागत नसेल तर याला तुमचे मिनरल्स, सकाळचं रूटीन जबाबदार असतं.
काय कराल उपाय?
रोज हलका व्यायाम करा. मॅग्नेशिअमचा आहारात समावेश करा. उन्हात बसा आणि लोकांना भेटा.