अंगावरून सकाळी भरभर पाणी घेतलं आणि शरीर पूर्ण स्वच्छ झालं असं बहुतेक लोकांना असं वाटतं. पण त्वचारोग तज्ज्ञ याबाबत थोडं वेगळं मत मांडतात. रोज अंघोळ करताना आपण शरीराचे काही भाग नीट स्वच्छ करत नाही किंवा पूर्णपणे दुर्लक्ष करतो. कारण ऑफिसला जाण्याची घाई किंवा आंघोळ करण्याचा आळस. पण शरीरातील काही खास भागांमध्ये सर्वाधिक घाण आणि बॅक्टेरिया जमा होतात, ज्यामुळे दुर्गंधीबरोबरच इन्फेक्शनचा धोका वाढतो. या ठिकाणी योग्य स्वच्छता न केल्यास केवळ वासच येत नाही, तर त्वचेच्या गंभीर समस्या देखील निर्माण होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया शरीराचे ६ सर्वात जास्त घाण होणारे भाग, जे डर्मेटोलॉजिस्ट खास स्वच्छ ठेवण्याचा सल्ला देतात.
कानांच्या मागचा भाग
आपण चेहरा आणि केसांची खूप जास्त काळजी घेतो, पण अनेकदा कानांच्या मागील भागाकडे दुर्लक्ष करतो. येथे सेबेशियस ग्रंथी असतात, ज्या तेल रिलीज करतात. हे तेल घाम आणि धुळीसोबत मिसळल्यावर चिकट थर तयार होतो आणि त्यातून दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे हा भाग रोज साबण आणि पाण्याने स्वच्छ करणे आवश्यक आहे.
काखा आणि मान
खाकेमध्ये घामाच्या ग्रंथी अधिक सक्रिय असतात, त्यामुळे येथे बॅक्टेरिया पटकन वाढतात. तसेच मानेच्या घड्यांमध्ये तेल आणि घाण साचते. योग्य प्रकारे स्क्रब न केल्यास त्वचा काळवंडते आणि शरीराला वास येऊ लागतो.
नाभी
डर्मेटोलॉजिस्टनुसार नाभी हा शरीरातील सर्वात उबदार आणि ओलसर भाग आहे. त्याची रचना अशी असते की येथे बॅक्टेरिया सहज वाढतात. सगळ्यात जास्त बॅक्टेरिया याच भागात असतात. नियमित स्वच्छता न केल्यास नाभीतून दुर्गंधी येऊ शकते आणि गंभीर इन्फेक्शनचा धोका वाढतो.
नखांच्या आत
आपले हात दिवसभर अनेक वस्तूंना स्पर्श करतात. वॉशरूमचे हॅंडल, फोन, टॉयलेटमधील नळ, लॅपटॉप अशा कितीतरी वस्तूंना आपण हात लावतो. अशात नखांमध्ये साठलेले बॅक्टेरिया जेवताना थेट पोटात जाऊ शकतात. फक्त हात धुणे पुरेसे नाही, तर नखांच्या खालील घाण साबणाने स्वच्छ करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
पायांच्या बोटांमधील जागा
आंघोळ करताना आपण पायांवर पाणी टाकतो, पळपाय घासतो, पण बोटांच्या मधल्या जागा नीट चोळून धुत नाही. येथे ओलावा आणि घाम साचल्याने फंगल इन्फेक्शन किंवा ‘अॅथलीट्स फुट’ होण्याचा धोका वाढतो. आंघोळीनंतर हा भाग नीट कोरडा करणेही अत्यंत गरजेचे आहे.
स्वच्छतेचा योग्य मार्ग कोणता?
माइल्ड साबण वापरा: फार कडक साबणाऐवजी सौम्य साबण वापरा, जेणेकरून त्वचेतील नॅचरल ओलावा टिकून राहील.
वॉशक्लॉथचा वापर करा: शरीराचे लपलेले भाग स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ सूती कपडा किंवा वॉशक्लॉथ वापरा.
पूर्णपणे कोरडे करा: ओलावा हा बॅक्टेरिया आणि फंगस वाढण्याचं मुख्य कारण आहे. अंघोळीनंतर या सर्व भागांना टॉवेलने नीट पुसून कोरडे करा.
नियमित सवय ठेवा: ही स्वच्छता कधीतरी न करता, ती रोजच्या दिनक्रमाचा भाग बनवा.
दररोज योग्य पद्धतीने या भागांची स्वच्छता केल्यास दुर्गंधी, इन्फेक्शन आणि त्वचेच्या अनेक समस्यांपासून सहज बचाव करता येतो.
Web Summary : Experts highlight often-missed body parts during bathing, like behind the ears, navel, and between toes. Neglecting these areas can lead to odor, infections, and skin issues. Regular cleaning with mild soap and thorough drying are essential for hygiene and health.
Web Summary : विशेषज्ञ स्नान करते समय अक्सर छूट जाने वाले शरीर के अंगों पर प्रकाश डालते हैं, जैसे कान के पीछे, नाभि और पैर की उंगलियों के बीच। इनकी अनदेखी करने से दुर्गंध, संक्रमण और त्वचा की समस्याएं हो सकती हैं। हल्के साबुन से नियमित सफाई और अच्छी तरह सुखाना स्वच्छता और स्वास्थ्य के लिए जरूरी है।