आपल्या घरात अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. यापैकी काही अगदी सामान्य आहेत, जे आपण वारंवार वापरतो. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे धोकादायक आजार आणि कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. अनेक संशोधनातून असंही समोर आलं आहे की, स्वयंपाकघरातील अनेक वस्तूंमध्ये विषारी केमिकल्स आढळतात, जी हळूहळू शरीरात जमा होतात आणि काही काळानंतर कॅन्सर होऊ शकतो. आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या अशा ५ गोष्टींबद्दल जाणून घेऊया...
प्लास्टिकच्या बाटल्या आणि कंटेनर
तुम्ही ज्या प्लास्टिकच्या बाटलीत पाणी पीत आहात किंवा ज्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये पाणी पित आहात त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. प्लास्टिकमध्ये कॅन्सरजन्य घटक आढळतात. जर त्यांचा नियमित वापर केला तर धोकादायक आजार उद्भवू शकतात.
नॉन-स्टिक कुकवेअर
नॉन-स्टिक भांडी वापरल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो हे देखील संशोधनातून सिद्ध झालं आहे. नॉन-स्टिक भांड्यांच्या तळाशी कोटींग करण्यासाठी वापरली जाणारी गोष्ट कॅन्सरला कारणीभूत असते. जेव्हा ते वितळतं तेव्हा धोका आणखी वाढतो.
रिफाइंड तेल
ट्रान्स फॅट आणि रिफाइंड तेल असलेल्या पदार्थांचं जास्त सेवन केल्याने देखील कॅन्सर होऊ शकतो. रिफाइंड तेल वारंवार गरम केल्याने फ्री रॅडिकल्स बाहेर पडतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. हायड्रोजनेटेड तेलात ट्रान्स फॅट आढळतं, जे शरीरात जळजळ वाढवू शकतं आणि कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकतं.
फॉइल पेपर आणि प्लास्टिक
प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये किंवा एल्युमिनियम फॉइलमध्ये अन्न गरम करणं आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं. मायक्रोवेव्हमध्ये प्लास्टिक गरम केल्याने डायऑक्सिन नावाचं केमिकल बाहेर पडतं. यामुळे कॅन्सर होऊ शकतो. एल्युमिनियम फॉइलचा जास्त वापर केल्याने शरीरात एल्युमिनियमचं प्रमाण वाढू शकतं, ज्यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो. म्हणून, मायक्रोवेव्हमध्ये फक्त काचेचे किंवा सिरेमिक भांडी वापरण्याचा प्रयत्न करा.
प्रोसेस्ड मीट
जर तुम्ही प्रोस्टेड फूड प्रमाणेच प्रोसेस्ड मीट खात असाल तर ते हानिकारक आहे. यामुळे अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. कॅन्सर हा त्यापैकी एक आहे. म्हणून प्रोसेस्ड मीट खाणं टाळा. अनेक संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.