Signs of Poor Health : आपली त्वचा आणि केस हे केवळ सौंदर्य वाढवणारे नसून, शरीराच्या आतल्या आरोग्याचे महत्त्वाचे इंडिकेटर आहेत. पण अनेकदा आपण त्वचा आणि केसांमध्ये झालेले बदल यांकडे सामान्यपणे पाहतो. पण प्रत्यक्षात हे बदल शरीरातील काही गंभीर आतल्या समस्या दाखवत असतात. समस्या तेव्हा वाढते, जेव्हा आपण या बदलांकडे दुर्लक्ष करतो किंवा फक्त स्किन आणि हेअर ट्रीटमेंट करून ते झाकण्याचा प्रयत्न करतो. याच संकेतांबद्दल त्वचारोग तज्ज्ञ डॉ. गुरवीन वैरिच गारेकर यांनी एका व्हिडिओद्वारे इशारा दिला आहे.
1) मान आणि काखेमध्ये काळे डाग
मान किंवा अंडरआर्म्सवर काळे डाग दिसू लागले तर हे Acanthosis Nigricans असू शकते. हे अनेकदा इन्सुलिन रेसिस्टन्समुळे येतात. यामुळे टाइप–2 डायबिटीसचा धोका वाढू शकतो. महिलांमध्ये हा बदल PCOS चे लक्षणही असू शकतो, कारण पीसीओएसमध्ये इन्सुलिन रेसिस्टन्स सामान्य असतो.
2) डोळ्यांच्या भोवती पिवळे डाग
पापण्यांवर किंवा डोळ्यांच्या कडेला दिसणारे पिवळसर उभट डाग Xanthelasma म्हणून ओळखले जातात. हे शरीरात कोलेस्टेरॉल वाढल्याचे स्पष्ट लक्षण आहे. लिपिड लेव्हल जास्त असल्यास हृदयविकाराचा धोकाही वाढतो.
3) वारंवार ओठ फाटणे
ओठांच्या कोपऱ्यावर सतत फुटणे, जळजळ किंवा सूज येणे याला Angular Cheilitis म्हणतात. ही समस्या काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होते. जसे की, व्हिटामिन B12, आयर्न, फोलेट इत्यादी.
4) कोरडी, खवल्यासारखी त्वचा
मॉइश्चरायझर वापरूनही त्वचा खूप कोरडी आणि फ्लेकी राहत असेल तर हे Hypothyroidism चे संकेत आहेत. थायरॉइड नीट काम न केल्याने त्वचेची नैसर्गिक ओलावा टिकवण्याची क्षमता कमी होते.
5) कमजोर केस आणि नखं
खूप जास्त केस गळणे, तुटणे किंवा नखं मऊ होऊन तुटणे हे प्रथिनांच्या कमतरतेचे लक्षण आहे. केराटिन ज्यामुळे केस आणि नखं बनतात हे स्वतः प्रोटीन असते. शरीरात प्रोटीन कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम केस आणि नखांवर दिसतो.
