Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 

Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 

Health: कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं हाताच्या बोटांवरून तसेच शरीराच्या काही भागांवरून लक्षात येतात, अशा वेळी कोणते उपाय करावे? ते जाणून घ्या. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 14:04 IST2025-08-16T13:59:22+5:302025-08-16T14:04:13+5:30

Health: कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं हाताच्या बोटांवरून तसेच शरीराच्या काही भागांवरून लक्षात येतात, अशा वेळी कोणते उपाय करावे? ते जाणून घ्या. 

Health: Increased cholesterol in the body can be seen from two fingers of the hand; take 'this' remedy immediately | Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 

Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 

आजच्या धावपळीच्या जीवनात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची समस्या सामान्य झाली आहे. वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. एका संशोधनानुसार, कोलेस्ट्रॉल वाढताच डुपुयट्रेन कॉन्ट्रॅक्चर नावाचे लक्षण हाताच्या चौथ्या आणि पाचव्या बोटावर दिसू शकते. ते वेळीच लक्षात आले तर कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात ठेवणे सोपे जाऊ शकते. 

जर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असेल तर तुम्हाला हृदयविकाराचा धोका होऊ शकतो. कोलेस्ट्रॉल हा एक प्रकारचा चरबी थर असतो, जो शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांमध्ये मदत करतो. परंतु जेव्हा रक्तात त्याचे प्रमाण वाढते तेव्हा ते तुमच्यासाठी धोकादायक ठरते.

कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा झाले की त्यांना नुकसान पोहोचवते. कोलेस्ट्रॉलचे लक्षण तुमच्या बोटांमध्ये देखील दिसू शकते. असे अलीकडेच एका संशोधनात सिद्ध झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, कोलेस्ट्रॉल वाढल्याची सर्वसामान्य लक्षण असतात, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो म्हणून लोकांना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकसारख्या जीवघेण्या स्थितीचा सामना करावा लागतो तेव्हा वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचे धोके कळतात. जसे की सतत येणारा थकवा, वारंवार होणारी डोकेदुखी, श्वास घेताना त्रास, पाय, पोटऱ्या, टाच दुखणे, त्वचेवर पिवळे डाग पडणे ही प्राथमिक लक्षणं मानली जातात. त्याबरोबरच हाताच्या बोटांवरून कोलेस्ट्रॉल वाढीचे लक्षण कसे ओळखावे ते जाणून घेऊ. 

डुपुयट्रेन कॉन्ट्रॅक्चरचे लक्षण : 

हाताच्या चौथ्या आणि पाचव्या बोटात म्हणजेच करंगळी आणि अनामिकेत डुपुयट्रेन कॉन्ट्रॅक्चरचे लक्षण दिसणे ही कोलेस्ट्रॉल वाढ समजली जाते. ही एक समस्या आहे. ज्यामध्ये तळहाताच्या नसा  चौथ्या आणि पाचव्या बोटांना सरळ करण्यासाठी काम करतात. वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे त्या आखडतात. ज्यांची  कोलेस्टेरॉलची पातळी खूप जास्त असते अशा लोकांमध्ये ड्युप्युट्रेन कॉन्ट्रॅक्चर बहुतेकदा दिसून येते. याशिवाय, धूम्रपान, मद्यपान आणि मधुमेही रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसू शकतात. 

हा आजार काय आहे?

क्लिव्हलँड क्लिनिकच्या मते, ड्युप्युट्रेन कॉन्ट्रॅक्चर ही एक अनुवांशिक समस्या आहे, ज्यामध्ये तळहाताखाली आणि बोटांखालील त्वचेची पहिली लेअर जाड आणि घट्ट होते. तळहातावर गुठळ्यांसारखे लहान अडथळे तयार होऊ लागतात. कालांतराने, हे गुठळे जाड होतात, ज्यामुळे बोटे इतकी वाकतात की त्यांना सरळ करणे अशक्य होते. चांगली गोष्ट म्हणजे या गुठळ्या कर्करोगाचे लक्षण नाहीत, परंतु ते उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण आहेत.

त्याची लक्षणे काय आहेत

>> तळहाताखाली किंवा चौथ्या-पाचव्या बोटाखाली लहान गुठळ्या तयार होणे
>> कालांतराने हे गुठळे जाड होतात आणि शिरासारखे दिसू लागतात
>> बोटे इतकी कडक आणि वाकतात की त्यांना सरळ करणे कठीण होते
>> सूज, जळजळ किंवा वेदना खाज जाणवत राहते 

कोलेस्ट्रॉल कसे कमी करावे?

>> निरोगी आहार घ्या
>> शारीरिक व्यायाम करा
>> धूम्रपान टाळा
>> तणाव घेऊ नका
>>वजन नियंत्रित करा

Web Title: Health: Increased cholesterol in the body can be seen from two fingers of the hand; take 'this' remedy immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.