Join us

सगळे सांगतात भरपूर पाणी प्यायचं, पण पाणी कसं-कधी प्यावं माहिती आहे का? सद्गुरू सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 23:46 IST

पाणी पिण्याची योग्य पद्धत याचा आपल्या शरीरावर आणि मनावरही परीणाम होतो.

पाणी आपल्या जीवनातील खूप महत्वाचा घटक आहे.  मानवाच्या शरीरात ७० टक्के पाणी आहे. हे तरल पदार्थ शरीराच्या चांगल्या कार्यासाठी फार महत्वाचे असतात. ज्यामुळे उर्जेचा स्तर आणि शरीराचे तापमान मेंटेन राहते. इशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासूदेव सांगतात की, पाणी तुम्ही कसं साठवून ठेवता तसंच पाणी पिण्याची योग्य पद्धत याचा आपल्या शरीरावर आणि मनावरही परीणाम होतो. पाण्याचा मानसिक संतुलनावर सरळ परीणाम होतो. सद्गुरू जग्गी वासूदेव  सांगतात की पाणी पिऊन तुम्ही स्वत:ला उत्तम बनवू शकता. (Health How To Drink Water Correctly Sadhguru Tips Drinking Habbits For Better Health)

पाणी कसे साठवून ठेवावे?

सद्गुरू सांगतात की पाणी धातुच्या भांड्यात  ठेवणं  उत्तम मानलं जातं. तांबा, पितळ यापैकी कशाचेही मिश्रण चालेल. जुन्या काळात लोक तांब्याची भांडी रात्री चिंच किंवा हळद लावून साफ करायचे. त्यावर राख लावून पाणी भरत होते.  याचं कारण फक्त परंपरा नाही तर विज्ञान आहे. तांब्यातील पोषक तत्व पाण्याला शुद्ध करतात जे शरीरासाठीही फायदेशीर ठरतात.

उन्हाळ्याच्या दिवसांत मातीच्या भांड्यात पाणी ठेवणंही उत्तम मानलं जातं. ज्यात पाणी नैसर्गिक स्वरूपात थंड राहतं. पोटाला विश्रांती मिळते ज्यामुळे फक्त गारवा मिळत नाही तर शरीराचे तापमानही संतुलित राहते. पाणी पिताना पाण्याप्रती कृतज्ञता आणि आदर असायला हवा. आपल्या शरीराला जिवंत ठेवणारे हे तत्व आहे याची जाणीव असायला हवी. फक्त धन्यवादाची भावना ठेवल्यास शरीराती ऊर्जा बदलता येऊ शकते.

शक्य होईल तेव्हा पाणी हातांनी प्या. हातांनी पाणी प्यायल्यानं एक वेगळाच आनंद मिळतो. धातुच्या ग्लासात पाणी घेतल्यास दोन्ही हातांनी पकडून नंतर प्या. ज्यामुळे पाण्याप्रती आदर बनून राहील आणि मन स्थिर राहण्यास मदत होईल.

शरीराला जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा पाणी प्यायला हवं. तसंच पाणीयुक्त फळं संत्री, काकडी, भाज्यांमध्ये ७० ते ९० टक्के पाणी असतं. हायड्रेट राहण्यासाठी या फळांचा आहारात समावेश करा ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि त्वचा चमकदार राहते. संपूर्ण दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते. पाणी हा आपल्या जीवनाचा आधारसुद्धा आहे. पाणी प्यायल्यानं शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहते.

English
हिंदी सारांश
Web Title : Sadhguru's tips: Right way to drink water for better health.

Web Summary : Water is vital. Sadhguru emphasizes storing it in metal containers and drinking mindfully. Gratitude enhances its benefits. Consume water-rich fruits. Proper hydration balances body and mind, boosting energy and skin health.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल