Join us

मोमोज आवडीने खाताय, तर मग तुम्हीच स्वत:चा जीव धोक्यात टाकताय, होतील 'हे' गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 16:48 IST

मोमोज हा अनेकांच्याच सर्वात आवडतीचा पदार्थ आहे. पण हे चटपटीत मोमोज तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत.

भारतात स्ट्रीट फूडची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे आणि मोमोज हा अनेकांच्याच सर्वात आवडतीचा पदार्थ आहे. पण हे चटपटीत मोमोज तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत. अनेक रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की, जास्त मोमोज खाल्ल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या शरीराचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं.

मोमोज मैद्यापासून बनलेले असतात. मैदा सहज पचत नाही आणि आतड्यांमध्ये चिकटू राहतो, ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगणे यासारख्या समस्या उद्भवतात. मोमोजसोबत दिली तिखट लाल चटणी निकृष्ट दर्जाच्या मिरच्यांपासून बनवली जाते. ही चटणी मूळव्याध आणि इतर आजारांचा होण्याचा धोका वाढवते. ही चटणी जास्त खाल्ल्याने पोट आणि आतड्यांमध्ये जळजळ, सूज आणि रक्तस्त्राव देखील होऊ शकतो.

मोमोजमध्ये वापरल्या जाणाऱ्या मैद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढते. मैद्यामध्ये असलेले स्टार्च आणि मोमोजमध्ये असलेलं मोनोसोडियम ग्लूटामेट (MSG) लठ्ठपणा निर्माण करू शकते. मोमोज नियमितपणे खाल्ल्याने कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी वाढू शकते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढतो. 

मोमोजच्या आतमध्ये जे सारण असतं त्यासाठी भाज्या किंवा इतर जे काही पदार्थ वापरले जातात त्याच्या गुणवत्तेची काळजी घेतली नाही तर त्यामुळे फूड पॉयजनिंग आणि पोटात इन्फेक्शन होऊ शकतं. २०२० मध्ये, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग अँड न्यूट्रिशन, पुसा यांनी एक अभ्यास केला. त्यात असं आढळून आलं की, दिल्लीतील रस्त्यावरील पदार्थ विशेषतः मोमोजमध्ये कोलिफॉर्म बॅक्टेरियाचे प्रमाण खूप जास्त असतं, जे अतिसार आणि इतर पचन रोगांना कारणीभूत ठरतं.

मोमोजमध्ये असलेला मैदा, MSG आणि तिखट चटणी हे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं. अनेक रिसर्चमध्ये मोमोजच्या अतिसेवनामुळे कॅन्सरचा धोका असल्याचंही नोंदवण्यात आलं आहे. मोमोजमध्ये वापरले जाणारे MSG आणि मैदा मऊ आणि पांढरा करण्यासाठी वापरले जाणारे अ‍ॅझोडीकार्बोनामाइड आणि बेंझॉयल पेरोक्साइडसारखे केमिकल्स कॅन्सरचा धोका वाढवू शकतात.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्न