Join us

थकवा येतो-रात्री तळपाय दुखतात? या तेलानं तळव्यांची मालिश करा, स्ट्रेस कमी होईल-शांत झोपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 17:55 IST

Health Benefits Of Oil Foot Massage : पायांची मालिश केल्यानं शरीरात ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते ज्यामुळे शरीराल रिलॅक्स वाटतं.

चांगली झोप येण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. धावपळीच्या जीवनात कामाच्या ताण तणावामुळे येतात बरेचजण मोबाईल पासून रात्रभर जागत राहतात त्यांना अनिद्रेचा सामना करावा लागतो.  बऱ्याच लोकांना रात्री शांत झोप येत नाही. (How To Get  Sleep Faster)  याचे साईड इफेक्टसही दिसून योग्य लाईफस्टाईल फॉलो केल्यास ताणतणाव कमी होऊन शांत झोप येण्यास मदत होते.

हेल्थ एक्सपर्ट्ससुद्धा योग्य प्रमाणात झोप घेण्याचा सल्ला देतात. ज्या लोकांना शारीरिक थकवा, पायांमध्ये वेदना, अनिद्रा, ताण-तणावाचा त्रास असतो त्यांना रात्री झोपण्याआधी पायांच्या तळव्यांना मालिश करणं फायदेशीर ठरतं. (Health Benefits Of Oil Foot Massage Which Massage Oil Is Best Before Sleeping For Sleep And Stress)

डॉक्टर तेजस्विनी यांच्यामते रात्री झोप येत नसल्यास या तेलानं तळव्यांची मालिश केल्यास चांगली झोप येण्यास मदत होते. पायांची मालिश केल्यानं शरीरात ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते ज्यामुळे शरीराल रिलॅक्स वाटतं. अनेकजण या बाबतीत गोंधळलेले असतात की पायांची मालिश करण्यासाठी योग्य तेल कोणतं. 

तिळाचे तेल

मेडीकल न्युज टु डे च्या रिपोर्टनुसार ताण, अनिद्रेची समस्या दूर करण्यासाठी झोपण्याआधी या तेलानं रोज आपल्या तळव्यांची मसाज करा. यात टायरोसिन अमिनो एसिड असते. जे सेरोटोनिन हॉर्मोन्स वाढवते. जो एक हॅप्पी हॉर्मोन आहे.  ज्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो. चांगली झोप येते आणि तुम्ही ताण-तणाव मुक्त राहता.   मोहोरीचं तेल

मोहोरीच्या तेलाला आयुर्वेदात फायदेशीर म्हटले गेले आहे. पायांची तेलानं मसाज केल्यानं मांसपेशींना आराम मिळतो आणि ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. मालिश केल्यानंतर मासिक पाळी दरम्यान पोटदुखी होत नाही. इनसोम्निया समस्या उद्भवल्यास कोमट  तेलानं मालिश करा. ज्यामुले एंग्जायटी आणि ताण-तणावापासून  आराम मिळतो. 

आई-बाबांनी 'या' ४ गोष्टी करा, स्वाभीमानी, हूशार होतील मुली; आत्मविश्वासही वाढेल

बदामाचे तेल

बदामाच्या तेलानं पायांची मसाज केल्यानं ताण-तणावापासून सुटका होते आणि डिप्रेशन दूर होते. मानसिक शांतीसाठी रोज या तेलानं  तळव्यांची मालिश करायला हवी. याचे इतर अनेक फायदे आहेत.

केळी आणल्यानंतर एका दिवसात नरम- काळी पडतात? ३ ट्रिक्स, आठवडाभर ताजी राहतील केळी

नारळाचे तेल

नारळाच्या तेलानं पायांची मालिश केल्यानं मानसिक आरोग्य चांगले राहते. ताण-तणाव, चिंता उद्भवत नाही. याशिवाय मांसपेशींमध्ये वेदना होत नाही. हे तेल लावल्यानं तुम्हाला आरामदायक वाटू शकतं. 

लेव्हेंडर तेल

या तेलात एंटीबॅक्टेरिअल, एंटीसेप्टीक, एंटी इन्फ्लेमेटरी गुण असतात पायांची मालिश करण्यासाठी  तुम्ही याचा वापर केल्यास पायांना आराम मिळतो. चिंता, ताण-तणाव, थकवा कमी होतो. अनिद्रेचे समस्या दूर करण्यासाठी तुम्ही नॅच्युरल ट्रिटमेंट करू शकता. याशिवाय ज्या लोकांचे केस जास्त गळतात. त्यांच्यासाठी हा उपाय उत्तम आहे. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल