Join us

सकाळी उठल्या-उठल्या फक्त 'हे' काम करा! वाढलेलं वजन, कुरकुरणारी तब्येत सगळं येईल ताळ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2024 16:27 IST

Health Benefits Of Having Warm Water In Morning Every Day: दुखणीखुपणी टाळून तब्येत ठणठणीत ठेवायची असेल तर ही एक सवय तुम्हाला लावूनच घ्या...(best method to keep ourself healthy and fit)

ठळक मुद्दे रिकाम्यापोटी  कोमट पाणी प्यायल्यास त्याचे आरोग्याला काय फायदे होऊ शकतात आणि ते गरम पाणी नेमकं कोणत्या पद्धतीने प्यायला हवं?

आपण हल्ली बघत आहोत की प्रत्येकाच्याच आरोग्याच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत. कोणाला ॲसिडीटीचा त्रास होतो तर कोणाचे वजन कमीच होत नाही. कमी वयातच अनेकांच्या मागे बीपी, शुगर, हृदयविकार असा त्रास लागला आहे. असे बरेचसे त्रास कमी करायचे असतील आणि वजन आटोक्यात ठेवायचे असेल तर झोपेतून उठल्यावर रिकाम्यापोटी १ ग्लास गरम पाणी प्यावे, असा सल्ला आहारतज्ज्ञ देत आहेत (best method to keep ourself healthy and fit). या पाण्यात कोणते पदार्थ टाकायचे आणि त्याने आरोग्याला काय फायदा होऊ शकतो, ते पाहूया..(health benefits of having warm water in morning every day)

 

सकाळी रिकाम्यापोटी गरम पाणी पिण्याचे फायदे

रिकाम्यापोटी  कोमट पाणी प्यायल्यास त्याचे आरोग्याला काय फायदे होऊ शकतात आणि ते गरम पाणी नेमकं कोणत्या पद्धतीने प्यायला हवं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ foodiejablaynoor या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

'लोक काय म्हणतील' असा विचार करत झुरता? तब्बू सांगते तिनं केलेला खास उपाय...

यामध्ये असं सांगण्यात आलं आहे साधं गरम पाणी जर तुम्ही रिकाम्यापोटी प्यायलं तर ते आरोग्यासाठी चांगलंच आहे. पण जर गरम पाण्यात तुम्ही चिमूटभर किसलेलं आलं, हळद, मिरेपूड, १ टीस्पून तूप असं सगळं साहित्य घालून ते प्यायलं तर ते अधिक उत्तम.

केस धुतल्यानंतर 'हा' पदार्थ लावा! जावेद हबीब सांगतात स्ट्रेटनिंग न करताही केस होतील सिल्की, मुलायम

यासाठी पाणी पातेल्यात टाकून गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात हळद, मिरेपूड, आलं घाला आणि पाण्याला एक उकळी येऊ द्या. त्यानंतर हे पाणी जेव्हा पिता येण्याजोगं होईल तेव्हा ते एका ग्लासमध्ये गाळून घ्या आणि त्यात तूप टाकून प्या.

 

रिकाम्यापोटी काेमट पाणी का प्यावं?

१. रात्रभर आपण पाणी प्यायलेलं नसतं. त्यामुळे आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून सकाळी सगळ्यात आधी गरम पाणी प्यावं.

२. गरम पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया, चयापचय क्रिया अधिक चांगली होते. यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी साठून राहण्याचे प्रमाण बरेच कमी होते.

३. हळद आणि आल्यामध्ये असणारे ॲण्टीबॅक्टेरियल घटक शरीर निरोगी राहण्यासाठी आणि शरीरावरची सूज कमी करण्यासाठी मदत करतात.

मोत्याच्या जोडव्यांचे सुंदर डिझाईन्स- नव्या नवरीसाठी नवी फॅशन, घ्या काहीतरी वेगळं- एकदम युनिक

४. गरम पाण्यात मिरेपूड, हळद, आलं टाकून प्यायल्याने कफ, सर्दीचा त्रास होत नाही. तसेच राेगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

५. गरम पाण्यात जर लिंबाचा थोडा रस टाकून प्यायलं तर त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन सी मिळते. आरोग्यासोबतच त्वचेचं सौंदर्य टिकून ठेवण्यासाठीही मदत होते. नॅचरल डिटॉक्स ड्रिंक म्हणून हे पाणी ओळखलं जातं. कारण हे पाणी प्यायल्यामुळे शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर स्वच्छ होण्यास मत होते. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सवेट लॉस टिप्स