Curd Daily Eating Benefits : दही आपल्या भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. दह्याला सुपरफूड मानलं जातं, कारण त्यात प्रोबायोटिक्स भरपूर असतात. आणि आपल्या पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर असतं. यात असलेले 'गुड बॅक्टेरिया' आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवतात. याशिवाय दह्यात कॅल्शियम, व्हिटामिन B12 आणि प्रोटीन भरपूर असतं. ज्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि शरीरातील ऊर्जा टिकून राहते. अशात दररोज दही खाल्ल्याने कोणते आरोग्यदायी फायदे मिळतात हे पाहुयात.
रोज दही खाल्ल्याचे आरोग्यदायी फायदे
हृदय निरोगी ठेवतं
दही हृदयासाठी अत्यंत लाभदायक आहे. हे शरीरातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण नियंत्रित ठेवतं आणि धमण्यांमध्ये ते जमा होऊ देत नाही. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्यातील पोटॅशियम ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करतं आणि हायपरटेन्शनपासून संरक्षण करतं.
पचन सुधारतं
दह्यातील प्रोबायोटिक्स म्हणजेच 'गुड बॅक्टेरिया' पोटातील घातक बॅक्टेरियाचा नाश करतात आणि पचनक्रिया सुधारतात. ज्यांना गॅस, पोटफुगी, जडपणा किंवा IBS सारख्या समस्या आहेत, त्यांनी दररोज दही खाल्ल्यास आराम मिळू शकतो.
वजन कमी करण्यास मदत करतं
दह्यात असलेलं कॅल्शियम शरीरातील कॉर्टिसोलचे प्रमाण कमी करतं. हा हार्मोन पोटाभोवती चरबी साचण्यास कारणीभूत असतो. रोज एक वाटी दही खाल्ल्याने कॉर्टिसोल कमी होते आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच दही लीन मसल मास टिकवून ठेवते, ज्यामुळे वजन घटल्यावर शरीर फिट दिसतं.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
दही इम्युनिटी वाढवण्यासाठी बेस्ट मानलं जातं. त्यातील गुड बॅक्टेरिया शरीराला इन्फेक्शनपासून वाचवतात, रोगांशी लढण्याची क्षमता वाढवतात आणि महिलांमध्ये होणाऱ्या यीस्ट इन्फेक्शनपासूनही संरक्षण करतात.
हाडे आणि दात मजबूत ठेवतं
दही हे कॅल्शियम आणि फॉस्फरसचं उत्तम स्रोत आहे. हे दोन्ही घटक हाडे आणि दात मजबूत ठेवतात आणि आर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांपासून बचाव करतात. दररोज दही खाल्ल्यास हाडे दीर्घकाळ मजबूत राहतात आणि शरीराची ताकद वाढते.
Web Summary : Daily yogurt consumption boosts immunity, aids digestion, strengthens bones, and helps manage weight. It's rich in probiotics, calcium, and protein, promoting heart health and overall well-being. Incorporating yogurt into your diet can lead to significant health improvements.
Web Summary : रोज दही का सेवन प्रतिरक्षा को बढ़ाता है, पाचन में मदद करता है, हड्डियों को मजबूत करता है और वजन को प्रबंधित करने में सहायता करता है। यह प्रोबायोटिक्स, कैल्शियम और प्रोटीन से भरपूर होता है, जो हृदय स्वास्थ्य और समग्र कल्याण को बढ़ावा देता है। दही को अपने आहार में शामिल करने से महत्वपूर्ण स्वास्थ्य सुधार हो सकते हैं।