Join us

सकाळी पोट साफ होत नाही, संडासला त्रास होतो? जेवणानंतर रोज २ पदार्थ पाण्यासोबत प्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 14:41 IST

Health benefits Of Drinking Saunf Ajwain Water : तसंच बडीशेपेतील एंटीबॅक्टेरिअल गुण पोटातील बॅक्टेरिअल इन्फेक्शन रोखण्यास प्रभावी ठरतात

ओवा आणि बडिशेप या दोन्ही अशा प्राकृतिक औषधी आहेत. ज्या जुन्या  काळापासून पोटाशी संबंधित आजारांसाठी उपयोगात आणल्या जात आहेत. ओवा आतड्यांसाठी फायदेशीर ठरतो. तसंच बडीशेपेतील एंटीबॅक्टेरिअल गुण पोटातील बॅक्टेरिअल इन्फेक्शन रोखण्यास प्रभावी ठरतात. (Health benefits Of Drinking Saunf Ajwain Water)

ओव्यात अनेक प्रकारचे डायजेस्टिव्ह इंजाईम्स असतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. पोटातील गॅस, एसिडीटीची समस्या कमी होण्यास मदत होते. याच्या सेवनानं भूक वाढते, चुर्णाच्या स्वरूपात किंवा पाण्यात उकळवून तुम्ही याचे सेवन करू शकता. जर पोट  साफ न होण्याचा त्रास तुम्हाला होत असेल तर ही रेसिपी परिणामकारक ठरेल. (Reasons To Have Saunf Ajwain Water After Every Meal)

बडिशेपेत व्हिटामीन  सी आणि फायबर्स असतात

बडिशेप पोटाच्या समस्यांसाठी उत्तम मानली जाते. यात व्हिटामीन सी आणि फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. बडिशेपेचं पाणी प्यायल्यानं पोटातील सूज, वेदनांपासून आराम मिळतो. पचनक्रिया चांगली राहते. याव्यतिरिक्त बडीशेपचेचं सेवन केल्यानं आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

‘ही’ ५ लक्षणंच सांगतात, शरीरात व्हिटामीन बी-१२ कमी झालंय; लगेच आहार बदला, लवकर करा उपाय

हे मिश्रण शरीराला डिटॉक्सिफाय करते. मेटाबॉलिझ्म वाढतो आणि सकाळी याचे सेवन केल्यानं अधिकाधिक फायदे मिळतात. ओवा आणि बडीशेपेचं पाणी फक्त पोटासाठीच नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी लाभदायक ठरतं. याचे नियमित सेवन केल्यानं पचनक्रिया  चांगली राहते. इतर पचनाच्या समस्या  उद्भवत नाहीत.

गॅस्ट्रीक समस्यांपासून आराम मिळतो

गॅस्ट्रीक समस्या आजकालच्या जीवनशैलीचा एक सामान्य हिस्सा बनल्या आहेत. अनियमित खाणं-पिणं, ताण-तणाव आणि चुकीची जीवनशैली यांमुळे ही समस्या वाढते. अशा स्थितीत काही प्राचीन घरगुती उपाय करून तुम्ही पोटाच्या समस्या  दूर करू  शकता. रोज  रिकाम्या पोटी ओव्याचं पाणी पिण्याची सवय लावा. ओव्याचे पाणी आतड्यांमधील एंजाईम्सना सक्रिय करण्यास मदत करतात. ज्यामुळे पचनक्रिया  चांगली राहते. योग्य पचनक्रिया असल्यास गॅस्ट्रीक ससमस्या उद्भवत नाहीत. ओव्यात मोठ्या प्रमाणात थायमोल असते ज्यामुळे गॅसची समस्या उद्भवत नाही.

राजेशाही तोड्यांचे १० आकर्षक पॅटर्न; लग्नसराईत अभिमानानं मिरवावा असा पारंपरिक दागिना

ओव्याचं पाणी कसं बनवायचं

ओव्याचं पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा घाला आणि रात्रभर तसंच सोडून द्या. सकाळी हे पाणी गाळून प्या. नियमित  हे केल्यानं गॅस्ट्रीक समस्या उद्भवत नाहीत. याव्यतिरिक्त मल त्याग करणं  सोपं होतं. यामुळे शरीरातील  विषारी  तत्व बाहेर पडतात आणि तुम्हाला ताजंतवानं वाटेल.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल