lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सदगुरु सांगतात, न चुकता खायला हवं विड्याचं पान, पाहा विडा खाण्याचे ४ भन्नाट फायदे...

सदगुरु सांगतात, न चुकता खायला हवं विड्याचं पान, पाहा विडा खाण्याचे ४ भन्नाट फायदे...

Health Benefits of betel leaf vidyacha pan : विड्याचे पान औषधी का असते आणि त्याचा शरीराला कसा फायदा होतो याबद्दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2024 05:09 PM2024-02-27T17:09:46+5:302024-02-27T17:12:10+5:30

Health Benefits of betel leaf vidyacha pan : विड्याचे पान औषधी का असते आणि त्याचा शरीराला कसा फायदा होतो याबद्दल

Health Benefits of betel leaf vidyacha pan : Sadguru says, you should eat vida leaf without fail, see 4 amazing benefits of vida... | सदगुरु सांगतात, न चुकता खायला हवं विड्याचं पान, पाहा विडा खाण्याचे ४ भन्नाट फायदे...

सदगुरु सांगतात, न चुकता खायला हवं विड्याचं पान, पाहा विडा खाण्याचे ४ भन्नाट फायदे...

जेवण झाल्यावर विड्याचे पान देण्याची रीत आपल्या परंपरेत आहे. त्यामुळे लग्नकार्य किंवा सणवार असेल तर आपल्याकडे आवर्जून विडा खाल्ला जातो. धार्मिक विधींमध्येही आपल्याकडे विड्याला अनन्यासाधारण महत्त्व असते. विड्यामुळे खाल्लेले अन्न चांगल्या पद्धतीने पचण्यास मदत होत असल्याने विडा आरोग्यासाठी चांगला असतो इतकंच आपल्याला माहित असतं. पण याशिवायही  विड्यामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असे बरेच गुणधर्म असतात. विड्याच्या पानांमध्ये टॅनिन, प्रोपेन, अल्कलॉइडस, फिनाईल यांसारखे घटक असतात. विड्याच्या पानाचे रोप नसून वेल असतो, ज्याला नागवेल असेही म्हणतात. या पानाचा तांबूलही केला जातो. प्रसिद्ध योगगुरु सद्गुरू जग्गी वासुदेव हाच विडा खाण्याचे फायदे सांगतात. विड्याचे पान औषधी का असते आणि त्याचा शरीराला कसा फायदा होतो याबद्दल ते नेमकी काय माहिती देतात पाहूया (Health Benefits of betel leaf vidyacha pan)...

१. या पानात क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने अन्नासोबत पोटात काही विषारी पदार्थ गेले असतील तर ते शरीराबाहेर पडण्यासाठी विड्याचे पान खाण्याचा चांगला फायदा होतो. 

२. या पानात अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण जास्त असल्याने बद्धकोष्ठतेसारख्या पचनाशी निगडीत समस्येवर हे पान फायदेशीर ठरते.     

३. या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असून तोंडातील बॅक्टेरियापासून दूर राहण्यास मदत होते. तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास या पानाचा चांगला उपयोग होतो.  

४. विटामिन सी, विटामिन ए, लोह, कॅल्शियमसारखे अनेक पोषक तत्व आढळतात जे शरीराला पोषण देण्यास फायदेशीर असतात. 

Web Title: Health Benefits of betel leaf vidyacha pan : Sadguru says, you should eat vida leaf without fail, see 4 amazing benefits of vida...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.