lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आपट्याची पाने फेकू नका, आपट्याचं पाणी पिण्याचे ५ फायदे- पित्त आणि उष्णतेच्या त्रासावर गुणकारी उपाय

आपट्याची पाने फेकू नका, आपट्याचं पाणी पिण्याचे ५ फायदे- पित्त आणि उष्णतेच्या त्रासावर गुणकारी उपाय

Health benefits of apta pane best use of aptyachi pane : आपट्याचं पान आणि कांचनची पानं यातील फरक ओळखायला हवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2023 05:44 PM2023-10-25T17:44:12+5:302023-10-25T17:49:11+5:30

Health benefits of apta pane best use of aptyachi pane : आपट्याचं पान आणि कांचनची पानं यातील फरक ओळखायला हवा.

Health benefits of apta pane best use of aptyachi pane : Do not throw away the leaves of Apta, 5 benefits of drinking Apta water - effective remedy for pitta and heat problems | आपट्याची पाने फेकू नका, आपट्याचं पाणी पिण्याचे ५ फायदे- पित्त आणि उष्णतेच्या त्रासावर गुणकारी उपाय

आपट्याची पाने फेकू नका, आपट्याचं पाणी पिण्याचे ५ फायदे- पित्त आणि उष्णतेच्या त्रासावर गुणकारी उपाय

दसऱ्याच्या दिवशी कुटुंबातील मोठी मंडळी लहानांना आपट्याची पाने देतात. आपट्याचे पान म्हणजे सोन्याचे पान असे म्हटले जाते. आयुष्यात सोन्यासारखी भरभराट होऊदे असा आशीर्वादही त्यासोबत दिला जातो. आपण ही आपट्याची पाने घेतो आणि इकडेतिकडे ठेवून देतो. इतकेच नाही तर जास्तीची आणलेली आपट्याची पानेही पुढे कित्येक दिवस घरात तशीच लोळत राहतात. जास्तीच्या फुलांचा आपण देवपूजासेठी उपयोग करु शकतो, पण आपट्याच्या पानांचे तसे नसते. त्यामुळे एकतर ती निर्माल्य म्हणून टाकून दिली जातात. मात्र अतिशय औषधी गुणधर्म असलेली ही पाने सुकली तरीही टाकून न देता त्याचा सौंदर्य आणि आरोग्य अशा दोन्हीसाठी आपण अतिशय चांगला उपयोग करु शकतो. 

आपट्याचं पान आणि कांचनची पानं यातील फरक ओळखायला हवा. हल्ली बरेचदा आपट्याची म्हणून कांचनाची पाने विकली जातात. मात्र आपट्याची पानं छोटी असतात, कांचनची त्या तुलनेत मोठी असतात, त्यामुळे आपण नक्की आपट्याचीच पानं घेतोय ना याची खात्री अवश्य करायला हवी. आपट्याची पाने पाण्यात उकळून मग गाळून हे पाणी प्यायल्यास आरोग्याच्या बऱ्याच समस्यांवर ते फायदेशीर असते. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. पौर्णिमा काळे यांनी हे पाणी पिण्याचे औषधी गुणधर्म सांगितले असून त्याचे नेमके काय फायदे होतात पाहूया...

(Image : Google )
(Image : Google )

१. आपट्याला आयुर्वेदामध्ये अश्मंतक म्हणतात. आपट्याचे पान हे तुरट (कषाय) रसाचे आहे. 
आपट्याचे पान पित्त, कफ दोष कमी करणारे आहे. ऑक्टोबरमध्ये वातावरण सतत बदलत असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच 

२. ऑक्टोबर महिन्यात उष्णता जास्त प्रमाणात असल्याने या काळात युरीनशी निगडीत समस्या उद्भवण्याची शक्यता असते. आपट्याचे पान थंड प्रकृतीचे असल्याने युरीनला जळजळ होत असल्यास ही पाने भिजत घालून मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढून तो प्यायल्यास जळजळ कमी होते. लघवीच्या वेळी येणारी कळ, कंड याने कमी होतो. 

३. काही जणांना प्रमेहामुळे तळपायाची आग होणे, तोंडाची आग होणे,  कोरड पडणे अशा समस्या उद्भवतात. मात्र हे त्रास कमी होण्यासाठी आपट्याच्या पानांचा रस गुणकारी ठरतो. 

(Image : Google )
(Image : Google )

 
४. जुलाबाच्या समस्येमध्ये या पानांचा चांगला उपयोग होतो. तसेच बऱ्याच जणांना विविध कारणांनी पित्ताचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी आपट्याची पाने अतिशय फायदेशीर ठरतात. जंत, अजीर्ण यांसारख्या समस्यांवरही आपट्याच्या पानाचा रस उपयुक्त ठरतो. 

५. थायरॉईड ही गेल्या काही वर्षात वाढत असलेली समस्या आहे. ही समस्या दूर होण्यासाठी आपट्याची पाने विशेष उपयुक्त असतात. पाने स्वच्छ धुवून, सुकवून मिक्सरला चूर्ण करावे, ते चूर्ण वस्त्रगाळ करून अर्धा चमचा मधासोबत सेवन करावे. यामुळे थायरॉईडची समस्या आटोक्यात येण्यास मदत होते. 

Web Title: Health benefits of apta pane best use of aptyachi pane : Do not throw away the leaves of Apta, 5 benefits of drinking Apta water - effective remedy for pitta and heat problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.