रात्रीच्या वेळेस व्यवस्थित झोप झाली नसेल तर दिवसभर अस्वस्थ वाटतं आणि काम करण्याचा मूडच नसतो. झोप ही कोणत्याही इलेक्ट्रीक स्विचप्रमाणे नसते ऑन केल्यावर झोप येईल, ऑफ केल्यावर झोप येणार नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांना झोपेसाठी खूपच स्ट्रगल करावा लागतो. शरीर व्यवस्थित राहण्यासाठी तसंच रिकव्हर होण्यासाठी ७ ते ८ तासांची झोप खूपच आवश्यक असते, पण रात्री लवकर झोप न आल्यामुळे आणि सकाळी लवकर उठाव लागत असल्यामुळे अनेकांची झोपच पूर्ण होत नाही. (Health 10-3-2-1-0 Rule A Doctor Suggests For Perfect Sleep And Morning Energy)
अपोलो हॉस्टिपटलचे सिनियर न्युटरोलॉजिस्ट डॉ, सुधीर कुमार यांच्या म्हणण्यानमुसार तुमचा मेंदू सुरक्षित ठेवण्यासाठी चांगली झोप खूपच आवश्यक असते. झोप चांगली येण्यासाठी १०-३-२-१-० हा नियम फॉलो करावा लागतो. (How To Get Sleep Faster At Night)
झोपण्याच्या १० तास आधी कॅफेनपासून दूर राहा
कॅफेन तुमच्या रक्तातून पूर्णपणे बाहेर येण्याासठी १० तासांचा वेळ लागतो. तुम्हाला असं वाटू असेल की चहा किंवा कॉफी संध्याकाळी उशीरा प्यायल्यानं काही होत नाही पण असं नाही. कॅफेनचा तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो आणि वारंवार चहा, कॉफी प्यायल्यानं रात्री नीट झोप येत नाही.
आवळे उन्हात न सुकवता आवळा कॅण्डी करण्याची सोपी रेसिपी; रोज २-३ खा-इम्युनिटी वाढेल
झोपण्याच्या ३ तास आधी खाऊ नका
झोपण्याच्या ३ तास आधी काहीही खाऊ नका. जेवण नेहमी झोपण्याच्या ३ तास आधीच घ्या. जर तुम्ही १० वाजता झोपत असाल तर संध्याकाळी ७ वाजता जेवा. तर तुम्ही ११ वाजता झोपत असाल तर ८ वाजता जेवा. झोपेच्या कमतरतेमुळे खाल्लेच्या अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही ज्यामुळे जडपणा आणि सुस्ती येते.
झोपण्याच्या २ तास आधी ऑफिसच्या कामापासून दूर राहा
झोपण्याच्या आधी आपलं डोकं शांत होण्यासाठी एक बफर जोन द्या. ऑफिसच्या कामांचा, अडचणींचा विचार रात्री करू नका. तुमचा मेंदू एक्टिव्ह मोडमधून रेस्ट मोडमध्ये जाण्यासाठी याची फार आवश्यकता असते.
पंख्यावर धुळीचे थर- पाहा पंखा झटपट साफ करण्याची सोपी युक्ती, दमायचं काम नाही.
झोपण्याच्या १ तास आधी ब्लू लाईटपासून दूर राहा
मोबाईल फोन आणि टॅबलेटमधून निघणारे ब्लू लाई्टस झोपेसाठी कारणीभूत असणारे हॉर्मोनन मेलाटोनिन तयार होण्यापासून रोखतात. म्हणून झोपण्याच्या १ तास आधी स्क्रीनपासून दूर राहा. मोबाईल वापरण्याऐवजी तुम्ही कोणतंही पुस्तक वाचू शकता किंवा कोणताही पॉडकास्ट ऐकू शकता.
Web Summary : Struggling with sleep? Dr. Sudhir Kumar suggests the 10-3-2-1-0 rule: avoid caffeine 10 hours before bed, no food 3 hours prior, stop work 2 hours before, and ditch screens 1 hour before sleep for improved rest and energy.
Web Summary : नींद की समस्या? डॉ. सुधीर कुमार का सुझाव: सोने से 10 घंटे पहले कैफीन, 3 घंटे पहले भोजन, 2 घंटे पहले काम और 1 घंटे पहले स्क्रीन से दूर रहें, ताकि बेहतर नींद और ऊर्जा मिले।