Join us
Daily Top 2 Weekly Top 5

सावधान! तुमचे आवडते हेडफोन्स ठरतील आरोग्यासाठी 'व्हिलन'; वापरणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:14 IST

एका नवीन रिसर्चमधून असं समोर आलं आहे की, बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक हेडफोन्समध्ये असे केमिकल्स आढळले आहेत, जे आरोग्यासाठी हानिकारक मानले जातात.

मोबाईल आणि लॅपटॉपसोबत हेडफोन आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. अनेकजण तासनतास हेडफोन लावून कॉलवर बोलतात, गाणी ऐकतात किंवा ऑफिसचं काम करतात. मात्र एका नवीन रिसर्चमधून असं समोर आलं आहे की, बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक हेडफोन्समध्ये असे केमिकल्स आढळले आहेत, जे आरोग्यासाठी हानिकारक मानले जातात.

या रिसर्चमध्ये वेगवेगळ्या ब्रँड्सच्या अनेक हेडफोन्सची चाचणी करण्यात आली. यामध्ये स्वस्त आणि महागड्या अशा दोन्ही मॉडेल्सचा समावेश होता. चाचणीत असं दिसून आलं की, जवळपास सर्वच हेडफोन्समध्ये असे काही केमिकल्स आहेत जे प्लास्टिकला मजबूती देण्यासाठी वापरली जातात. हे केमिकल्स दीर्घकाळ त्वचेच्या संपर्कात राहिल्यास शरीरासाठी घातक ठरू शकतात.

घाम आणि उष्णतेमुळे वाढतो धोका

रिपोर्टनुसार, हेडफोन्सचा थेट स्पर्श कानांच्या आणि चेहऱ्याच्या त्वचेला होतो. उष्णता आणि घामामुळे यातील केमिकल्स हळूहळू शरीरात प्रवेश करू शकतात. जे लोक दररोज कित्येक तास हेडफोन वापरतात, त्यांच्यासाठी हा धोका अधिक असू शकतो. विशेषतः लहान मुलं आणि तरुण जे दीर्घकाळ इयरफोन्स लावून असतात, त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब आहे.

हार्मोन्सवर होऊ शकतो परिणाम

अभ्यासात असंही समोर आलं आहे की, हे केमिकल्स हार्मोन्सशी संबंधित समस्या वाढवू शकतात. दीर्घकाळ या केमिकल्सच्या संपर्कात राहिल्याने शरीराच्या नैसर्गिक संतुलनावर परिणाम होऊ शकतो. जरी यामुळे त्वरित एखादा मोठा आजार होत नसल्याचं म्हटलं असलं, तरी दीर्घकालीन वापरामुळे धोका नक्कीच वाढू शकतो.  

English
हिंदी सारांश
Web Title : Warning! Your favorite headphones can harm your health: Danger alert!

Web Summary : Headphones, used daily, may contain harmful chemicals. Research reveals these chemicals, used to strengthen plastic, can be absorbed through skin contact, posing long-term health risks, especially with prolonged use and heat exposure, potentially disrupting hormones.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स