Sleeping Tips : आजकाल झोप न लागण्याची समस्या खूपच वाढली आहे. अनेक लोकांना रात्री खूप वेळ बिछान्यावर पडूनही डोळ्याला झोप येत नाही. काहींना दिवसभराची थकवा असूनही रात्री २–३ वाजेपर्यंत झोप लागत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अंगात सुस्ती, कमजोरी जाणवते. अशा वेळी अनेकजण मेलाटोनिनसारख्या गोळ्या किंवा झोपेचे सप्लिमेंट्स घेण्यास भाग पडतात.
जर तुम्हालाही अशी समस्या असेल, तर हा उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील डॉ. त्रिशा पसरीचा यांनी एक सोपा आणि प्रभावी उपाय सांगितलाय ज्यामुळे औषधांशिवायही पटकन झोप लागते.
काय आहे हा उपाय?
डॉ. त्रिशा यांच्या मते, झोपण्यापूर्वी पाय गरम केल्यास झोप पटकन येते.
- आरामदायक सॉक्स घालू शकता
- झोपण्यापूर्वी १० मिनिटं कोमट पाण्यात पाय बुडवू शकता
- झोपण्याच्या १–२ तास आधी कोमट पाण्यानं शॉवर घ्या
किती लवकर झोप लागते?
संशोधनानुसार, फक्त पाय गरम ठेवल्यास लोकांना साधारण ७–१० मिनिटं लवकर झोप लागते. मेलाटोनिनच्या गोळ्या घेतल्यावर इतकाच वेळ वाचतो म्हणजेच, सॉक्स घालणं किंवा पाय गरम करणं हे मेलाटोनिनसारख्या औषधाइतकंच प्रभावी ठरू शकतं.
गाढ झोप लागण्यासाठी टिप्स
खोलीचं तापमान थोडं गार ठेवा
झोपण्यापूर्वी मोबाईल/स्क्रीनचा वापर टाळा.
झोपण्याच्या किमान ३–४ तास आधीपर्यंत चहा किंवा कॉफी पिणं टाळा
रात्री जड जेवण टाळा
पुस्तकं वाचा किंवा मेडिटेशन करा