Join us

प्लास्टिक चॉपिंग बोर्ड रोज वापरता? हार्मोन्स बिघडतात-फर्टिलिटीवरही होतो वाईट परिणाम, पाहा काय चुकतंय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2025 14:00 IST

plastic chopping board health risks : harmful effects of plastic chopping board : प्लास्टिक चॉपिंग बोर्ड वापरणे सोयीचे असले तरी, शरीराला नेमके कसे नुकसान पोहोचवू शकते ते पाहा...

फळं, भाज्या चिरण्यासोबतच किचनमधील अनेक काम सहज करता यावी यासाठी चॉपिंग बोर्ड वापरला जातो. सध्या वेगवेगळ्या मटेरियलपासून तयार केलेले अनेक (plastic chopping board health risks) प्रकारचे चॉपिंग बोर्ड सहज विकत मिळतात. परंतु यापैकी बऱ्याच घरांमध्ये, प्लास्टिकचाच चॉपिंग बोर्ड वापरला जातो. वापरायला हलका, स्वच्छ करायला सोपा आणि स्वस्त असल्यामुळे अनेकांच्या स्वयंपाकघरात प्लास्टिकचाच चॉपिंग बोर्ड असतो. परंतु, हा सोयीस्कर आणि आकर्षक दिसणारा चॉपिंग बोर्ड आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो(plastic chopping board side effects on body).

जेव्हा आपण फळं व भाजी चिरण्यासाठी या बोर्डवर चाकू, सूरी वापरतो, तेव्हा या प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण अन्नामध्ये मिसळण्याची मोठी शक्यता असते. हे कण थेट आपल्या पचनसंस्थेत जातात आणि शरीरासाठी गंभीर समस्या निर्माण करू शकतात. प्लास्टिक चॉपिंग बोर्ड वापरणे आपल्या शरीराला नेमके कसे नुकसान पोहोचवू शकते आणि (harmful effects of plastic chopping board) हा धोका कसा टाळायचा, हे पाहूयात. 

प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड वापरण्याचे नुकसान... 

१. अन्नपदार्थात मायक्रोप्लास्टिक मिसळते :- जेव्हा आपण प्लास्टिक बोर्डवर भाज्या किंवा काही पदार्थ कापतो, तेव्हा त्यातून प्लास्टिकचे खूप छोटे कण म्हणजेच मायक्रोप्लास्टिक या अन्नपदार्थात मिसळू शकते. न्यूट्रिशनिस्ट भारद्वाज म्हणतात की, 'जे लोक रोज प्लास्टिक बोर्डचा वापर करतात, ते दरवर्षी लाखो मायक्रोप्लास्टिक कण अन्नपदार्थामार्फत आपल्या शरीरात घेत असतात. हे कण शरीरात हळूहळू जमा होऊ लागतात, जे पोटाच्या आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतात आणि सूज वाढवू शकतात.' संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, पॉलीइथायलीन आणि पॉलीप्रोपायलीन पासून तयार झालेल्या चॉपिंग  बोर्डवर कोणतेही पदार्थ कापल्यास मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लास्टिक बाहेर पडतात. हे कण तुमच्या खाण्यात मिसळून पोटातील बॅक्टेरिया आणि संपूर्ण आरोग्यावर परिणाम करू शकतात.

२. BPA आणि फथलेट्स (Phthalates) सारखी हानिकारक रसायने :-

काही प्लास्टिकमध्ये BPA आणि फथलेट्स (Phthalates) सारखी हानिकारक रसायने असतात, जी आपल्या हार्मोनवर परिणाम करू शकतात. या रसायनांना एंडोक्राइन डिसरप्टर्स (Endocrine Disruptors) असे म्हटले जाते. ही रसायने कालांतराने प्रजनन क्षमता (Fertility), चयापचय आणि एकूणच आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतात. लहान मुले आणि तरुण पिढीसाठी ही गोष्ट अधिक जास्त हानिकारक आहे. 

डार्क सर्कल्सचा रंग सांगतो शरीरातील पोषक तत्वांची कमतरता! दुर्लक्ष करणे पडते महागात...

हार्टचा त्रास- ब्लड प्रेशरची समस्या असेल तर कोणतं मीठ खावं? डॉक्टर सांगतात, मिठाचं योग्य प्रमाण आणि प्रकार...

३. आतड्या आणि हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम :-

मायक्रोप्लास्टिक आतड्यांमध्ये सूज निर्माण करू शकतात आणि आतड्यातील बॅक्टेरियावर परिणाम करू शकतात. शरीरातील मायक्रोप्लास्टिकमुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या आजारांचा धोका वाढू शकतो. 

४. चॉपिंग बोर्ड वेळोवेळी करा स्वच्छ... 

जर चॉपिंग बोर्ड वेळोवेळी योग्य पद्धतीने स्वच्छ केले नाही तर त्यावर बॅक्टेरिया वाढू लागतात, जे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरते. प्लास्टिक चॉपिंग बोर्डवर लाकडी बोर्डापेक्षा जास्त बॅक्टेरिया असू शकतात. परंतु, एक गोष्ट लक्षात ठेवा—कोणताही बोर्ड, मग तो लाकडी असो, बांबूचा असो किंवा स्टीलचा, चाकूच्या वापरामुळे चॉपिंग बोर्डवर झालेल्या खुणांमध्ये बॅक्टेरियांची वाढ अधिक जलद गतीने होते. 

५. तज्ज्ञांचे मत काय आहे ?

एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत, फर्टिलिटी एक्सपर्ट डॉ. बुशरा खान सांगतात की, प्लास्टिक चॉपिंग बोर्डमध्ये असलेले मायक्रोप्लास्टिक आणि रसायने हार्मोन आणि प्रजनन क्षमतेच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. त्यांचे म्हणणे आहे की, गरज पडल्यास BPA-फ्री आणि चांगल्या गुणवत्तेच्या प्लास्टिक चॉपिंग बोर्डाचा वापर करावा. चॉपिंग बोर्डला वेळोवेळी काही कालांतराने बदलावा आणि स्वच्छतेसाठी लिंबू आणि ब्रश किंवा स्क्रबरचा वापर करावा.

English
हिंदी सारांश
Web Title : Plastic chopping boards: Harmful to hormones and fertility, experts warn.

Web Summary : Plastic chopping boards release microplastics, contaminating food and disrupting hormones. Experts warn of fertility issues and health risks. Choose safer alternatives and clean boards thoroughly.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नकिचन टिप्स