Join us

रोज कॉफी प्यायल्याने २ वर्षांनी वाढू शकतं तुमचं आयुष्य; रिसर्चमध्ये खुलासा, जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 12:58 IST

शरीरात ताजेपणा आणण्यासाठी कॉफी हे सर्वोत्तम पेय आहे. एक कप कॉफीमुळे तुम्हाला उत्साही वाटतं.

लाखो लोक आपल्या दिवसाची सुरुवात कॉफीने करतात. सकाळी जर तुम्हाला एक कप स्ट्राँग कॉफी प्यायला मिळाली तर तुमचं शरीर ताजेतवानं होतं. शरीरात ताजेपणा आणण्यासाठी कॉफी हे सर्वोत्तम पेय आहे. एक कप कॉफीमुळे तुम्हाला उत्साही वाटतं. काही लोक दिवसातून अनेक वेळा कॉफी पितात. तुम्हीही कॉफीचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. कॉफीमुळे २ वर्षांनी तुमचं आयुष्य वाढेल. 

नवीन रिसर्चमधून असं समोर आलं आहे की, कॉफी पिणारे सामान्य लोकांपेक्षा २ वर्षे जास्त जगू शकतात. जर्नल एजिंग रिसर्च रिव्ह्यूजमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टमध्ये असं आढळून आलं की, कॉफी पिणं शरीरासाठी फायदेशीर आहे. जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात कॉफीने करत असाल तर तुम्हाला हे समजल्यावर आनंद होईल की, कॉफी तुमचं आयुष्य वाढवण्यासही मदत करते. कॉफी पिणाऱ्यांचं आयुष्य २ वर्षांनी वाढू शकतं

कॉफी प्यायल्याने हृदयविकार राहतात दूर 

या रिसर्चमध्ये कॉफीमध्ये आढळणाऱ्या २००० हून अधिक बायोएक्टिव्ह कंपाऊंड्सचे गुणधर्म समोर आले आहेत, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. कॉफी प्यायल्याने हृदयविकार आणि अनेक जुन्या आजारांचा धोकाही कमी होतो, असं रिसर्चमध्ये म्हटलं आहे. या रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या लेखकाचं म्हणणं आहे की, जगातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी आणि आहारात बदल करून दीर्घायुष्य जगण्यास मदत होईल अशा गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे. कॉफी जुने आजार बरे करते असं रिसर्चमध्ये म्हटलं आहे. कॉफी प्यायल्याने हृदयविकार, न्यूरोलॉजिकल समस्या आणि इतर अनेक आजारांचा धोका कमी होतो.

कॉफीमध्ये असतात अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी 

कॉफी निरोगी जीवन जगण्यास मदत करते. कॉफीमध्ये २००० पेक्षा जास्त संभाव्य बायोएक्टिव्ह कम्पाऊंड असतात. यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी फायदे प्रदान करणारे, न्यूरोइंफ्लेमेशन कमी करणारे आणि इंसुलिन संवेदनशीलता नियंत्रित करणारे कम्पाऊंड समाविष्ट आहेत. कॉफीमध्ये 'अँटी-एजिंग' गुणधर्म असतात. कॉफी प्यायल्याने लिव्हर निरोगी राहते. मात्र जास्त कॉफी पिणं देखील हानिकारक असू शकतं कारण यामुळे शरीरात कॅफिनचे प्रमाण वाढतं.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स