Early Signs Of Liver Disease In Hands: शरीरात जरा काही गडबड झाली तर वेगवेगळे संकेत मिळतात. जे आपण वेळीच ओळखले तर पुढे होणारं शरीराचं मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. लिव्हरसारख्या महत्वाच्या अवयवात जर काही कमी - जास्त झालं तर शरीर वेगवेगळे संकेत देऊ लागतं. लिव्हर हा असा अवयव आहे जो शरीरात गुपचूप शेकडो आवश्यक ती कामे करत असतात. लिव्हर रक्त डिटॉक्स करण्यास, पचनक्रियेत आणि शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवण्यास महत्वाची भूमिका निभावतं. पण यात काही गडबड झाली तर शरीर संकेत देऊ लागतं. अनेकदा तर यातील बिघाडाची काही सुरूवातीची लक्षणं आपल्या हातांवर दिसू लागतात.
जर्नल ऑफ क्लीनिकल अॅन्ड एक्सपरिमेंटल हेपेटोलॉजीनुसार, हातांच्या त्वचेचा रंग बदलणे, तळहात लाल होणे, नखांचा रंग फिक्कट होणे, बोटांमध्ये थरथरी किंवा सतत खाज हे संकेत लिव्हरमध्ये काहीतरी समस्या असण्याकडे इशारा करू शकतात. फॅटी लिव्हर, हेपेटायटिस किंवा सिरोसिस आजारात अशी लक्षणं हळूहळू दिसतात. जी वेळीच ओळखणं महत्वाचं असतं.
हात लाल होणे
जर आपले हात खासकरून अंगठे आणि छोट्या बोटाच्या आजूबाजूला त्वचा लाल दिसत असेल तर याला पामर एरिथेमा असं म्हटलं जातं. लिव्हर जेव्हा योग्यपणे काम करत नाही तेव्हा ही समस्या होते आणि शरीरात अॅस्ट्रोजन हार्मोनची लेव्हल वाढते. कधी कधी ही लक्षणं निरोगी लोकांमध्येही दिसू शकतात. पण जर यासोबत थकवा किंवा काविळसारखी लक्षणं असतील तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.
टेरीज नेल्स
जर नखं जास्त पांढरी दिसत असतील आणि त्यांच्या कोपऱ्यांवर हलकी गुलाबी पट्टी दिसत असेल तर हा टेरीज नेल्सनचा संकेत असू शकतो. ही समस्या अनेकदा लिव्हर सिरोसिसमुळे ब्लड सर्कुलेशन आणि प्रोटीनच्या लेव्हलमध्ये बदल झाल्याने होते.
हात थरथरणे
जर हात मोकळे केल्यावर मनगटात किंवा बोटांमध्ये अचानक झटका बसल्यासारखं वाटत असेल तर याला एस्टेरिक्सिस म्हटलं जातं. ही समस्या लिव्हरमध्ये गंभीर गडबडीचा संकेत असू शकते. यात शरीरात जमा टॉक्सिन मेंदूला प्रभावित करू लागतात.
तळहातावर खाज
तळहात आणि तळपायावर कोणत्याही कारणाशिवाय पुरळ नसूनही खाज येत असेल तर लिव्हरमध्ये समस्येचा संकेत असू शकतो. अनेकदा असं तेव्हा होतं जेव्हा शरीरात पित्त असंतुलित होतं. एक्सपर्टनुसार, जर हातांमध्ये असे बदल दिसतील तर त्यांकडे कानाडोळा करू नका. वेळीच टेस्ट करून आणि योग्य ते उपचार घेऊन लिव्हरसंबंधी आजारांना रोखलं जाऊ शकतं.
