Join us

रात्री झोपेत हातांना मुंग्या येतात, हात सुन्न पडतात? 'या' आजारांचे असू शकतात संकेत, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 12:47 IST

Tingling in hands : खासकरून रात्री जर हातांना किंवा पायांना मुंग्या येत असतील तर आपण वेळीच सावध व्हायला पाहिजे.

Tingling in hands : हाता-पायांना मुंग्या येणं किंवा झिणझिण्या येणं ही एक कॉमन समस्या आहे. सामान्य समजून या समस्येकडे दुर्लक्ष करतात. पण असं करणं महागात पडू शकतं. ही समस्या सामान्य असली तरी सामान्य नसते, कारण ही समस्या 5 गंभीर आजारांचा संकेत असू शकते. खासकरून रात्री जर हातांना किंवा पायांना मुंग्या येत असतील तर आपण वेळीच सावध व्हायला पाहिजे. असं होण्याचं नेमकं कारण काय असतं हेच आपण पाहणार आहोत.

स्ट्रोक

मेंदूमध्ये रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होत नसल्याने रक्ताच्या गाठी तयार होतात. ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. ही समस्या असलेल्या लोकांना रात्री हाताना मुंग्या येण्याची समस्या होते.

व्हिटामिन बी १२ ची कमतरता

व्हिटामिन बी १२ शरीरात कमतरता झाल्याने वेगवेगळ्या समस्या होतात. त्यात हात सुन्न होणं किंवा हातांना झिणझिण्या येणं अशाही समस्या असतात. तुम्हाला सुद्धा ही समस्या होत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. 

हार्ट अ‍ॅटॅक आधीचा संकेत

रात्री झोपेत हाताना झिणझिण्या येणं हा हार्ट अ‍ॅटॅक आधीचा संकेत असू शकतो. जर तुम्हाला ही समस्या नेहमीच होत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. या स्थितीत इतरही काही लक्षणे दिसतात. जसे की, घाम येणे, मळमळ होणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चक्कर येणे इत्यादी.

डायबिटीसचा धोका

झोपेत हाताना मुंग्या येणे किंवा झिणझिण्या येणे हा डायबिटीस असण्याचा संकेत असू शकतो. जेव्हा आपलं शरीर योग्य प्रमाणत इन्सुलिन तयार करू शकत नाही, तेव्हा शरीर वेगवेगळे संकेत देतं. हाताना झिणझिण्या येणं त्यापैकी एक संकेत आहे.

औषधांचे साईड इफेक्ट्स

काही औषधांमुळे सुद्धा हात आणि पायांना झिणझिण्या येण्याची समस्या होते. अशात तुम्ही काही औषध घेत असाल आणि ही समस्या सतत होत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स