H3N2 Flu : पावसाळा म्हटला की, वेगवेगळ्या आजारांचा धोका नेहमीच वाढलेला असतो. डेंग्यू, मलेरियासोबतच सध्या देशातील काही भागांमध्ये खासकरून दिल्ली-एनसीआरमध्ये एच3एन2 फ्लू चा प्रभाव बराच वाढला आहे. ग्रामीण भागापासून अनेक शहरांमध्ये सर्दी आणि तापाची समस्या बघायला मिळत आहे. सामान्यपणे पावसानंतर असं इन्फेक्शन बघायला मिळतं. कारण वातावरणात बदल होतो, अशात व्हायरस पसरण्याला अधिक वाव मिळतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेनशनुसार, एच3एन2 वायरस प्रोटीनसाठी ओळखला जातो. यात दोन मुख्य म्हणजे हेमाग्लगुटिनिन (H3) आणि न्यूरामिनिडेस (N2 Flu) प्रोटीन असतात.
सर्दी-थकव्याकडे करू नका दुर्लक्ष
एच3एन2 फ्लू च्या लक्षणांमध्ये सामान्यपणे सर्दी किंवा थकवा यांसारखी असतात, पण नंतर ताप, अंगदुखी, खोकला वाढू शकतो. व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज पसरतो. वाढत्या प्रदूषण आणि बदलत्या हवामानामुळे आता विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.
जास्त धोका कुणाला?
लहान मुले, वृद्ध, किडनी, डायबिटीज, फुफ्फुसाचे आजार असलेले लोक यांना अधिक धोका असतो. आधीपासून एखादा आजार असल्यास डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषध घेणे आणि अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे.
सामान्य लक्षणं
ताप: 101-102°F
सर्दी, खोकला, घशात खवखव
थकवा, अंगदुखी, उलटी, जुलाब
पोट व डोकेदुखी
काहींना श्वास घेण्यात त्रास
काय उपाय कराल
२ दिवसांपेक्षा जास्त ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
घराबाहेर जाताना मास्क वापरा.
गर्दीत जाणं टाळा
दिवसभर भरपूर पाणी प्या, ORS घ्या.
हात वारंवार साबणाने धुवा, स्वच्छता राखा.
पोषणयुक्त आहार घ्या.
औषधांचा वापर फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने करा.