Guava Leaves For Sharper Eyesight : जर वय वाढलं असेल तर दृष्टी कमजोर होणं सामान्य बाब आहे. पण आजकाल कमी वयात नजर कमजोर होऊन लोकांना चष्म्याचा वापर करावा लागत आहे. लहान मुलांना सुद्धा जवळचं किंवा दूरचं कमी दिसू लागलंय. तर काहींना डोकेदुखीमुळे चष्मा वापरावा लागत आहे. कमी वयातच जर दृष्टी कमजोर झाली तर ही एक गंभीर समस्या आहे. मग अशात दृष्टी मजबूत ठेवण्यासाठी काय करावं? चष्मा घालवण्यासाठी काय करावं? असे प्रश्न सगळ्यांना पडतात. तर यावर एक खास घरगुती उपाय आहे. ज्याला आयुर्वेदात खूप महत्व आहे. असाच एक उपाय आज आपण पाहणार आहोत.
दृष्टी वाढवण्यासाठीचा उपाय
पेरूची पानं किंवा पेरूच्या पानांचा चहा हा डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. कारण यांमध्ये अॅंटी-ऑक्सीडेंट्स, व्हिटामिन ए आणि फ्लेवोनॉयड्स भरपूर असतात, ज्यामुळे डोळ्यांनी कमी दिसण्याची समस्या दूर होते. या पानांमुळे डोळ्यांच्या कोशिकांना पोषण मिळतं आणि त्यांचा फ्री रॅडिकल्सपासून बचावही होतो.
तसेच पेरूच्या पानांचे इतर फायदे सांगायचे तर या पानांमुळे शरीरातील सूज कमी होते आणि ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. जेव्हा डोळ्यांपर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सीजन आणि पोषक तत्व पोहोचतील, तेव्हाच डोळे चांगले राहतील. डोकेदुखी सुद्धा कमी होईल. पण असं अजिबात नाही की, हा डोळ्यांसाठीचा ठोस उपाय आहे. यानं डोळे निरोगी ठेवण्यासाठी मदत मिळू शकते.
कसा कराल पेरूच्या पानांचा चहा?
पेरूच्या पानांचा चहा करण्यासाठी ताजी 5 ते 6 पानं घ्या, एक पानी, थोडं मध घ्या. सगळ्यात आधी पेरूची पानं चांगली धुवून घ्या. एका पॅनमध्ये पाणी उकडवून घ्या आणि त्यात पानं टाका. 5 ते 7 मिनिटांनंतर गॅस बंद करा. चहा गाळून घ्या. त्यात वरून थोडं मध टाका. हा चहा सकाळी उपाशीपोटी किंवा झोपण्याआधी पिणं फायदेशीर ठरेल.
पेरूच्या पानांचे इतर फायदे
बद्धकोष्ठता लगेच होईल दूर
पेरूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं जे बद्धकोष्ठतेची समस्या सहजपणे दूर करतं. याने पचनास मदत मिळते आणि सकाळी पोट लवकर साफ होतं. पेरूच्या पानांमुळे रक्तात ग्लूकोजची लेव्हल वाढणंही रोखलं जातं.
इम्यूनिटी वाढते
पेरूच्या पानं जेवण केल्यावर खाल्ल्यास ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही. पेरूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सीडेंट्स आणि व्हिटामिन्स सी असतात. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. अशात शरीराचा अनेक आजार आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो.
डोळ्यांसाठी फायदेशीर
पेरूच्या पानांमध्ये व्हिटामिन ए भरपूर प्रमाणात असतं. जे डोळ्यांसाठी खूप गरजेचं आहे. नियमितपणे उपाशीपोटी पेरूच्या पानांचं सेवन केल्याने दृष्टी चांगली होते. पेरूच्या पानांमध्ये तणाव दूर करणारे गुण असतात आणि मानसिक आरोग्यही चांगलं राहतं.