Adrenal Cortical Cancer Case: इंग्लंडच्या ट्रिंग शहरात राहणारी २१ वर्षीय क्लियो लॅम्बर्ट (Cleo Lambert) चेहऱ्यावरील सूज म्हणजे "मून फेस", पोट फुगणे आणि अचानक वजन वाढणे अशा समस्यांमुळे वैतागली होती. आधी तिला वाटलं की, या समस्या चुकीची लाइफस्टाईल किंवा उपाशीपोटी कॉफी प्यायल्यामुळे झाल्या असतील. पण २०२३ मध्ये अनेकदा डॉक्टरांकडे गेल्यावर तिला चेहऱ्यावर केस आणि हार्मोन्स इम्बॅलन्स झाल्याचं दिसून आलं. पुढे तिला पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम (PCOS) झाल्याचं समजलं. डाएट आणि लाइफस्टाईलमध्ये बदल करूनही तिची तब्येत आणखी बिघडत गेली. त्यामुळे ती लोकांपासून दूर राहू लागली.
'द सन' च्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, टिकटॉकवर स्क्रोल करताना क्लियोला एक व्हिडीओ दिसला. ज्यात एक व्यक्ती आपल्या लक्षणाबाबत सांगत होता. जे साधारण क्लियोसारखेच होते. कमेंटमध्ये कुणीतरी कुशिंग सिंड्रोमचा उल्लेख केला होता. जो कॉर्टिसोलची लेव्हल वाढल्यामुळे होणारा एक हार्मोनल डिसऑर्डर आहे. यात क्लियोला पुढच्या मेडिकल टेस्ट करण्यासाठी प्रेरणा मिळाली.
अनेक ब्लड टेस्ट आणि स्कॅननंतर एका एमआरआयमध्ये तिच्या पोटाच्या डाव्या बाजूला १७ सेंटीमीटरचा एक ट्यूमर दिसला. हा स्टेज ४ चा अॅड्रेनल कॉर्टिकल कॅन्सर (Adrenal Cortical Cancer) होता. हा एक फार दुर्मीळ आणि अग्रेसिव्ह कॅन्सर आहे जो ग्लॅंड्समध्ये होतो. हे ग्लॅंड्स ब्लड शुगर रेग्युलेशन, मेटाबॉलिज्म आणि इम्यून सिस्टीमशी संबंधित हार्मोन्सचं प्रॉडक्शन करण्यासाठी जबाबदार असतात.
कॅन्सरची लक्षणं?
या कॅन्सरच्या लक्षणांमध्ये धडाचं वजन वाढणं, चेहरा गोल होणे, पिंपल्स, स्नायू कमजोर होणे, हाय ब्लड प्रेशर आणि थकवा यांचा समावेश असतो. क्लियोचा ट्यूमर इतका मोठा होता की, शरीरातील इतर अवयवांवर दबाव वाढला होता, ज्यामुळे तिला लगेच ट्रिटमेंटची गरज होती.
व्हिडिओनं वाचवला जीव
क्लियोनं त्या टिकटॉक व्हिडिओला तिचा जीव वाचवण्याचं श्रेय दिलं आहे. तिच्या डॉक्टरांनी सुद्धा हे मान्य केलं की, जर तिनं उपचारासाठी जराही उशीर केला असता तर तिच्या ट्यूमरची वाढ जीवघेणी ठरली असती.