Luke warm water with ghee : तब्येत चांगली ठेवण्यासाठी आणि नेहमीच फिट राहण्यासाठी एक्सपर्ट्स दिवसाची सुरूवात कोमट पाण्याने करण्याचा सल्ला देत असतात. असं केल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. अनेक एक्सपर्ट्स कोमट पाण्यात उपाशीपोटी तूप टाकून पिण्याचा देखील सल्ला देतात. अशात आज आपण पाहणार आहोत की, कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्यानं शरीराला काय काय फायदे मिळतात.
कोमट पाण्यात तूप टाकून पिण्याचे फायदे
1) सकाळी कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्याने आपली हाडे मजबूत होतात. तसेच याने शरीरातील न पचलेले पदार्थ बाहेर निघण्यासही मदत मिळते. सोबतच त्वचा चांगली राहते. इतकंच नाही तर जॉइंट्समध्ये होणारी वेदनाही दूर होते. याने चेहऱ्यावर मुलायमपणा कायम राहतो.
2) कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्याने आपलं मेटाबॉलिज्म बूस्ट राहतं. डिटॉक्ससाठीही तूपाचं सेवन फार चांगलं मानलं जातं. तेच उपाशीपोटी कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्याने वजन वेगाने कमी होतं. त्यासोबतच तुमची शुगर लेव्हलही नियंत्रित राहते.
3) तूपामध्ये अनेक पोषक तत्व असतात. जसे की, ओमेगा-3, ओमेगा-9, फॅटी अॅसिड, व्हिटामिन ए, के, ई त्याशिवाय यात व्हिटामिन सी व ब्यूटीरिक अॅसिडही असतं. हे सगळे तत्व तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात.
इतरही फायदे
रोज सकाळी उपाशीपोटी लसूण आणि तूप खाण्याचेही शरीराला अनेक फायदे मिळतात. जे खालीलप्रमाणे पाहता येतील.
इम्यून सिस्टीम मजबूत होतं
जर आपलं इम्यून सिस्टीम मजबूत नसेल तर तुम्हाला वेगवेगळे आजार आणि फ्लूची समस्या होऊ शकते. यापासून बचाव करण्यासाठी रात्री झोपण्याच्या तीन तासआधी लसूण आणि तूप खावं. याने शरीर आतून मजबूत होईल.
ब्लड प्रेशर कंट्रोल
हाय ब्लड प्रेशर करण्यासाठी लसूण खाणं फायदेशीर ठरू शकतं. कारण यात पोटॅशिअम, गुड फॅट आणि मॅग्नेशिअम सारखे तत्व आढळतात. जे तुम्हाला आतून मजबूत करण्यास फायदेशीर असतात. लसूण तुम्ही तूपाऐवजी मधासोबतही खाऊ शकता. याचं सेवन केल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं.
पोटाच्या समस्या होतात दूर
जर तुम्हाला नेहमीच पोटासंबंधी समस्या होत असेल तर या स्थितीतही तुम्ही लसूण आणि तूपाचं सेवन करू शकता. याचं कारण यात फायबर आणि मॅग्नेशिअम असतं. जे पोटासंबंधी समस्या दूर करतं. त्यामुळे याचं रोज योग्य प्रमाणात सेवन करावं. याने तुम्हाला बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटदुखी या समस्यांपासून सुटका मिळेल.