तूप हे भारतीय आहाराचा एक अविभाज्य घटक आहे. आजकाल पुन्हा तुपाचे महत्व लोकांना समजायला लागले आहे. (Ghee is best for health! Use ghee daily in cooking, you will definitely get a good look and health., good for skin and stomach )मात्र आधीसारखा तुपाचा वापर केला जात नाही. पारंपरिक पाककृतींमध्ये तुपाला विशेष स्थान आहे. बटर आणि तेल यांच्या तुलनेत तूप अधिक आरोग्यदायी व गुणकारी मानले जाते. यामागे काही ठोस कारणेही आहेत.
तुपात भरपूर प्रमाणात गुड फॅट्स असतात. हे घटक शरीरात साठत नाहीत, उलट पचनास मदत करतात आणि ऊर्जा देतात. बटर किंवा तेल वापरल्यास शरीराची चरबी वाढत जाते. ते पदार्थ त्वचेजवळ साठतात. अर्थात त्यांचा वापर बंद करणे हा पर्याय नाही. पण तेलापेक्षा जास्त तूप वापरणे उत्तम. जेव्हा तेल-बटर अतिप्रमाणात वापरले जातात तेव्हा त्याचा परिणाम फार वाईट होतो. योग्य प्रमाणात तूप खाल्यास शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारते. तेल आपल्या रोजच्या वापराचे आहे. योग्य प्रमाणात तेल वापरावे मात्र विकतचे बटर अजिबात खाऊ नये. वजन तर झटक्यात वाढते तसेच हृदयासाठी ते चांगले नाही. बटरऐवजी घरचे लोणी घ्या. तसेच तूप घ्या.
तुपातील सत्वे आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. याशिवाय, तुपात असलेले अँण्टीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स आरोग्यासाठी गरजेचे असतात. जीवनसत्व ए, डी, सी, के यांचे प्रमाण तुपात भरपूर असते. आयुर्वेदानुसार तूप हे मेंदूच्या आरोग्यासाठी फार गरजेचे असते. तूप स्मरणशक्ती वाढवणारे असते. तूप वापरल्याने मानसिक शांतताही टिकून राहते कारण झोप सुधारते आणि एकूणच स्वास्थ चांगले राहते.
एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पचनक्रिया. तूप हे सहज पचणारे असून पचनक्रियेला चालना देते. बटर आणि तेल अनेक वेळा जड वाटतात आणि पचनावर ताण देतात. विशेषतः लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठी तूप अधिक योग्य मानले जाते. त्वचेसाठी तर तूप वरदान आहे.
तूप हे केवळ एक खाद्य घटक नसून आरोग्यदायी पदार्थ आहे. योग्य प्रमाणात आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून तूप खाल्यास ते बटर व तेलाच्या तुलनेत अधिक गुणकारी, पोषक आणि आरोग्यदायी ठरते. त्यामुळे पारंपरिक पाककलेनुसार तुपाचा पुन्हा वापर करणे फायद्याचे ठरेल.