Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बरेच लोक चुकीच्या पद्धतीने पितात कॉफी, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत आणि फायदे

बरेच लोक चुकीच्या पद्धतीने पितात कॉफी, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत आणि फायदे

Right Way Of Drinking Coffee : गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी इन्स्टाग्रामवर कॉफीशी संबंधित काही सवयींबद्दल सांगितले आहे, ज्या तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीरही ठरू शकतात आणि काही वेळा नुकसानही करू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 14:09 IST2026-03-21T10:13:41+5:302026-03-21T14:09:41+5:30

Right Way Of Drinking Coffee : गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी इन्स्टाग्रामवर कॉफीशी संबंधित काही सवयींबद्दल सांगितले आहे, ज्या तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीरही ठरू शकतात आणि काही वेळा नुकसानही करू शकतात.

Gastroenterologist explains right way of drinking coffee and its benefits | बरेच लोक चुकीच्या पद्धतीने पितात कॉफी, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत आणि फायदे

बरेच लोक चुकीच्या पद्धतीने पितात कॉफी, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत आणि फायदे

Right Way Of Drinking Coffee : तशी जास्तीत जास्त लोकांच्या दिवसाची सुरूवात गरमागरम चहाने होते. पण अलिकडे भरपूर लोक दिवसातून अनेकदा कॉफी पितात. एकतर कॉफीची टेस्ट चांगली लागते आणि त्यातून शरीराला देखील अनेक फायदे मिळतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की कॉफी पिण्याची योग्य पद्धत कोणती आहे? गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी इन्स्टाग्रामवर कॉफीशी संबंधित काही सवयींबद्दल सांगितले आहे, ज्या तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीरही ठरू शकतात आणि काही वेळा नुकसानही करू शकतात. चला जाणून घेऊया डॉक्टरांनी दिलेल्या काही महत्त्वाच्या आरोग्यविषयक सूचना.

सकाळी कॉफी कधी प्यावी? 

डॉ. सेठी यांच्या मते, सकाळी उठताच कॉफी पिण्याऐवजी 60 ते 90 मिनिटे थांबून कॉफी पिणे अधिक योग्य ठरते. यामुळे शरीरातील नैसर्गिक हार्मोन सायकलवर परिणाम होत नाही आणि कॉफीचा परिणामही अधिक चांगला मिळतो.

दिवसात 1 ते 3 कप पुरेसे

कॉफीचे प्रमाणही संतुलित असणे गरजेचे आहे. दिवसातून 1 ते 3 कप कॉफी योग्य मानली जाते. यापेक्षा जास्त कॉफी घेतल्यास ॲसिडिटी आणि झोपेच्या समस्या वाढू शकतात.

फिल्टर्ड ब्लॅक कॉफी हा उत्तम पर्याय

फिल्टर्ड ब्लॅक कॉफी अधिक हेल्दी मानली जाते. कारण त्यात साखर किंवा क्रीम मिसळलेले नसते. त्यामुळे ती कमी कॅलरीची आणि पोटासाठी हलकी असते.


साखर टाळणे ही चांगली सवय

कॉफीत जास्त साखर टाकणे टाळणे चांगले. साखर न घातलेली ब्लॅक कॉफी प्यायल्याने साखर आणि कॅलरीचे प्रमाण कमी राहते. तसेच अशी कॉफी लिव्हरसाठीही फायदेशीर मानली जाते.

उपाशीपोटी आणि रात्री कॉफी टाळा

उपाशीपोटी कॉफी प्यायल्याने ॲसिडिटी वाढू शकते, त्यामुळे कॉफी पिण्यापूर्वी थोडे काहीतरी खाणे चांगले. तसेच रात्री कॉफी पिल्यास झोपेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे रात्री कॉफी टाळणे योग्य.

ॲसिड रिफ्लक्स असणाऱ्यांसाठी वेगळी सूचना

ज्यांना ॲसिड रिफ्लक्सची समस्या असते त्यांनी लो-ॲसिड कॉफी, कोल्ड ब्रू किंवा डिकॅफिनेटेड कॉफी निवडावी. या प्रकारांमुळे साधारणपणे ॲसिडिटी कमी होते आणि जळजळ होण्याची शक्यता कमी असते.

Web Title : कॉफी पीने का सही तरीका: डॉक्टर के टिप्स, स्वास्थ्य लाभ और गलतियाँ

Web Summary : गैस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. सेठी के अनुसार, जागने के 60-90 मिनट बाद कॉफी पिएं। प्रतिदिन 1-3 कप तक सीमित करें। फ़िल्टर्ड ब्लैक कॉफ़ी अधिक स्वास्थ्यवर्धक है। चीनी, खाली पेट सेवन और रात में पीने से बचें। एसिड रिफ्लक्स के लिए लो-एसिड या डिकैफ़ विकल्प बेहतर हैं।

Web Title : Drink Coffee Right: Doctor's Tips for Health Benefits, Avoiding Mistakes

Web Summary : Gastroenterologist Dr. Sethi suggests drinking coffee 60-90 minutes after waking. Limit intake to 1-3 cups daily. Filtered black coffee is healthier. Avoid sugar, empty stomach consumption, and nighttime drinking. Low-acid or decaf options are better for acid reflux.