Join us
Daily Top 2 Weekly Top 5

कॅन्सर आणि ब्लड ग्रुपचं कनेक्शन काय, कोणत्या लोकांना अधिक असतो पोटाच्या कॅन्सरचा धोका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 11:15 IST

कोणत्याही व्यक्तीचा ब्लड ग्रुप त्या व्यक्तीचं एकंदर आरोग्य, इम्यून सिस्टीम आणि काही गंभीर आजारांच्या धोक्यांबाबत महत्वाचे संकेत देत असतो.

रक्त हे जीवन असतं. म्हणजे शरीरात जर रक्तच नसेल तर व्यक्ती जिवंतच राहणार नाही. प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळा ब्लड ग्रुप असतो. कोणत्याही व्यक्तीचा ब्लड ग्रुप त्या व्यक्तीचं एकंदर आरोग्य, इम्यून सिस्टीम आणि काही गंभीर आजारांच्या धोक्यांबाबत महत्वाचे संकेत देत असतो. यापैकी एक आजार म्हणजे कॅन्सर, खासकरून पोटाचा कॅन्सर ज्याला गॅस्ट्रिक कॅन्सर म्हणतात.

ब्लड ग्रुप आणि कॅन्सरचं कनेक्शन

जगभरात वाढत्या कॅन्सर केसेसदरम्यान वैज्ञानिकांनी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की, वेगवेगळ्या ब्लड ग्रुप असलेल्या लोकांमध्ये कॅन्सरचा धोकाही वेगळा असतो. २०२९ मध्ये मेडिकल जर्नल बीएमसी कॅन्सरमध्ये प्रकाशित एका संशोधनात धक्कादायक निष्कर्ष मांडले. या संशोधनानुसार, काही खास ब्लड ग्रुप असलेल्या लोकांमध्ये गॅस्ट्रिक कॅन्सर होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत अधिक आढळून आला.

गॅस्ट्रिक कॅन्सर हा पोटाच्या आतील थरात कोशिका असामान्य पद्धतीने वाढल्यामुळे होतो. ज्यामुळे हळूहळू हेल्दी टिश्यूजचं नुकसान होतं. हा आजार सुरूवातीला कळून येत नाही. त्यामुळे उशीरा याचं निदान होतं.

कोणत्या ब्लड ग्रुपवाल्यांना जास्त धोका?

संशोधनात आढळून आलं की, ब्लड ग्रुप ए आणि एबी असलेल्या लोकांना पोटाच्या कॅन्सरचा धोका अधिक अशतो. आकडेवारीनुसार, ब्लड ग्रुप ए असलेल्यांना ओ ब्लड ग्रुप असलेल्यांच्या तुलनेत कॅन्सरचा धोका १३ ते १९ टक्क्यांनी जास्त आढळून आला. तेच ब्लड ग्रुप एबीमध्ये हा धोका साधारण १८ टक्के असतो.

पँक्रियाटिक कॅन्सर आणि ब्लड टाइप

याआधी २००९ मध्ये दाना - फार्बर कॅन्सर संस्थेच्या अभ्यासकांनी ब्लड टाइप आणि कॅन्सर धोक्यातील संबंधाबाबत पुष्टी केली होती. हे संशोधन राष्ट्रीय कॅन्सर संस्थेच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालं होतं. या संशोधनात दोन मोठ्या हेल्थ ट्रॅकिंग स्टडीज, नर्सेस हेल्थ स्टडी आणि हेल्थ प्रोफेशनल्स फॉलोअल स्टडीच्या डेटाचं विश्लेषण करण्यात आलं.

निष्कर्षांनुसार ए ब्लड ग्रुपमध्ये पँक्रियाटिक कॅन्सरचा धोका ३२ टक्के जास्त होता. एबी ब्लड ग्रुपमध्ये हा धोका ५१ टक्के होता. तर ओ ब्लड ग्रुप असलेल्यांना एकूण कॅन्सरचा धोका जवळपास १६ टक्के कमी आढळून आला.

बॅक्टेरियाची मोठी भूमिका

एक्सपर्ट सांगतात की, ब्लड ग्रुप ए असलेल्या लोकांमध्ये हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाच्या बॅक्टेरियाने इन्फेक्शनचा धोका जास्त होता. ज्याला पोटाच्या कॅन्सरचं मोठं कारण मानण्यात आलं. आश्चर्याची बाब ही आहे की, काही केसेसमध्ये हा बॅक्टेरिया नसला तरी ब्लड ग्रुप असलेल्यांना कॅन्सरचा धोका असतो.

फक्त ब्लड ग्रुप दोष देणं योग्य नाही

डॉक्टर स्पष्टपणे सांगतात की, ब्लड ग्रुपला कॅन्सरचं एकमेव कारण मानलं जाऊ शकत नाही. सूजेवर कंट्रोल, इम्यून सिस्टीमची प्रतिक्रिया, सेल टू सेल इंटरॅक्शन आणि पोटात अॅसिडचं प्रमाण अशा कितीतरी गोष्टी कॅन्सरचा धोका वाढवतात. यात खाणं-पिणं, धूम्रपान, दारू, लठ्ठपणा, इन्फेक्शन आणि पर्यावरण या गोष्टींचाही समावेश असतो.

बचावाचे उपाय काय?

हेल्थ एक्सपर्ट स्पष्टपणे सांगतात की, आपला ब्लड ग्रुप कोणताही असो, हेल्दी लाइफस्टाईल, संतुलित आहार, तंबाखू खाणं टाळणे आणि नियमितपणे मेडिकल चेकअपने पोटाच्या कॅन्सरचा धोका टळतो. तसेच इतरही अनेक गंभीर आजारांचा धोका देखील कमी होतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Blood group link to cancer risk, especially stomach cancer.

Web Summary : Research suggests blood type influences stomach cancer risk. A and AB groups face higher risks. Lifestyle, diet, and check-ups are crucial for prevention, regardless of blood type.
टॅग्स : कॅन्सर जनजागृतीकर्करोगआरोग्यहेल्थ टिप्स