lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डाळी खाताना चुकूनही करू नका ४ चुका; शरीराला मिळणार नाही पोषण-उलट पचनास होईल त्रास

डाळी खाताना चुकूनही करू नका ४ चुका; शरीराला मिळणार नाही पोषण-उलट पचनास होईल त्रास

Four mistakes to avoid while eating Pulses : डाळ प्रत्येक जण खातो, पण करताना किंवा खाताना काही चुका महागात पडू शकतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2024 10:00 AM2024-04-17T10:00:25+5:302024-04-17T10:05:02+5:30

Four mistakes to avoid while eating Pulses : डाळ प्रत्येक जण खातो, पण करताना किंवा खाताना काही चुका महागात पडू शकतात..

Four mistakes to avoid while eating Pulses | डाळी खाताना चुकूनही करू नका ४ चुका; शरीराला मिळणार नाही पोषण-उलट पचनास होईल त्रास

डाळी खाताना चुकूनही करू नका ४ चुका; शरीराला मिळणार नाही पोषण-उलट पचनास होईल त्रास

आपल्या आहारात सर्वच गोष्टींचा समावेश असायला हवा (Pulses). पोळी, भाजी, कडधान्य, भात आणि कोशिंबीर असायलाच हवे. हे सर्वच पदार्थ आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे. यामुळे आरोग्याला अनेक पौष्टीक घटक मिळतात (Health Tips). शरीरात प्रोटीन्सची कमतरता होऊ नये म्हणून डाळींचे सेवन करायला हवे.

भारतात विविध प्रकारचे डाळी आढळतात. यामुळे शरीराला जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. पण डाळी खाण्याची देखील योग्य पद्धत आहे. डाळींचा आहारात समावेश करताना बरेच लोक काही चुका करतात. ज्यामुळे शरीराला आवश्यक प्रोटीन मिळत नाही(Four mistakes to avoid while eating Pulses).

यासंदर्भात, हार्ट डॉक्टर बिमल छाजेड सांगतात, बरेचसे लोक डाळी खाताना, किंवा त्याचे पदार्थ करताना चुका करतात. ज्यामुळे शरीराला पुरेसे पोषण मिळत नाही. शिवाय डाळीतील पोषणही कमी होते. त्यामुळे डाळींचे पदार्थ करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.'

खाऊन झाले की वजन वाढण्याचं टेन्शन येतं? ४ हेल्दी पदार्थ; वजन वाढणार नाही-खा बिनधास्त

डाळ रात्री भिजत घाला

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, 'काही लोक डाळ सरळ प्रेशर कुकरमध्ये शिजत घालतात, जे चुकीचे मानले जाते. तर काही जण डाळ शिजत घालण्यापूर्वी पाण्यात भिजत ठेवतात. पण १५ मिनिटं पुरेशी नसतात, डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा, व सकाळी त्याचे पदार्थ तयार करा. यामुळे डाळीतील पौष्टीक घटक योग्यरित्या शरीराला मिळतील.

सकाळी डाळी धुवून खा

रात्रभर भिजत ठेवल्यानंतर, सकाळी डाळीतील पाणी काढून धुवून त्याचा वापर करा. यामुळे डाळीवर असलेली केमिकल गोष्टी निघून जातील. डाळींवर फायटिक अॅसिड असते. जे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

मिश्र डाळी खा

कडधान्ये खाण्याची उत्तम पद्धत म्हणजे पाच प्रकारच्या डाळींचे मिश्रण करून खाणे. यामुळे शरीराला पोषक तत्व मिळू शकतात. मुख्य म्हणजे यामुळे शरीराला प्रथिनेही चांगल्या प्रमाणात मिळू शकतात.

विविध प्रकारच्या डाळी खा

कडधान्यांमध्ये अमिनो अॅसिड असते. काही डाळींमध्ये याचे प्रमाण जास्त असते, किंवा काही डाळींमध्ये कमी असते. त्यामुळे अधिक प्रथिने मिळविण्यासाठी वेगवेगळ्या कडधान्य मिसळून खाव्यात.

चार पायऱ्या चढताच दम लागतो? श्वासही फुलतो? न चुकता ५ पैकी १ गोष्ट रोज खा; राहाल फिट

पौष्टीक घटकांचा खजिना

एनसीबीआयच्या एका अहवालानुसार, डाळी शरीराला प्रोटीन आणि फायबर प्रदान करतात. तसेच यात आयर्न, झिंक, फॉलेट आणि मॅग्नेशियम यांसारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. त्यामुळे रोज अर्धा कप डाळी खा. 

Web Title: Four mistakes to avoid while eating Pulses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.