Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मळमळ- उलट्या आणि सतत बद्धकोष्ठतेने हैराण? पोटाच्या कॅन्सरची लक्षणे ओळखा, धोका टाळा ५ गोष्टी खा

मळमळ- उलट्या आणि सतत बद्धकोष्ठतेने हैराण? पोटाच्या कॅन्सरची लक्षणे ओळखा, धोका टाळा ५ गोष्टी खा

Foods to Lower Your Stomach Cancer Risk : पोटाचा कर्करोग टाळण्यासाठी खाण्यापिण्याचे नियमही पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2024 11:16 AM2024-05-24T11:16:33+5:302024-05-24T14:39:34+5:30

Foods to Lower Your Stomach Cancer Risk : पोटाचा कर्करोग टाळण्यासाठी खाण्यापिण्याचे नियमही पाळा

Foods to Lower Your Stomach Cancer Risk | मळमळ- उलट्या आणि सतत बद्धकोष्ठतेने हैराण? पोटाच्या कॅन्सरची लक्षणे ओळखा, धोका टाळा ५ गोष्टी खा

मळमळ- उलट्या आणि सतत बद्धकोष्ठतेने हैराण? पोटाच्या कॅन्सरची लक्षणे ओळखा, धोका टाळा ५ गोष्टी खा

सध्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आरोग्याचं गणित बिघडत चाललं आहे (Lifestyle). साधारण साठीनंतर होणारे आजार, लोकांना तिशीत किंवा चाळीशीत होत आहे. मुख्य म्हणजे खाण्याच्या सवयी बदलल्याने गंभीर आजारांचा धोका वाढत आहे (Health Tips). ज्यामुळे पोटाचे विकार तर वाढतातच, शिवाय पोटाच्या कर्करोगाचे (Stomach Cancer) प्रमाण वाढू लागले आहे. 

बरेच जण जंक फूडच्या आहारी गेले आहेत. ज्यामुळे शरीराला निरोगी पोषण मिळत नाही. त्याचा दुष्परिणाम आरोग्यावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिसून येतो. पोटाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय असून, वेळीच याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. निरोगी जीवनशैलीसोबत आहारात अँटी ऑक्सिडेंट आणि पोटाच्या कर्करोगापासून बचाव करणाऱ्या गुणधर्मयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवं(Foods to Lower Your Stomach Cancer Risk).

पोटाच्या कर्करोगाची लक्षणे

पोटाच्या कर्करोगानेग्रस्त असलेल्या रुग्णांना सुरुवातीच्या टप्प्यात, उलट्या आणि मळमळ जाणवू शकते. नंतर छातीत जळजळ, कमी खाल्ल्यानेही पोट भरल्यासारखे वाटणे, पोटात इन्फेक्शन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या जाणवल्यास पोटाचा कर्करोग आपल्याला असू शकतो.

चहा करताना साखर आधी घालावी की नंतर? फक्कड चहा घरी करताना घाला '१' सिक्रेट पदार्थ

हळद

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते, हळदीचे दररोज सेवन केल्याने गंभीर आजारांचा धोका टाळता येऊ शकतो. यामध्ये असलेल्या कर्क्यूमिन कंपाऊंडमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-कॅन्सर गुणधर्म असतात. कर्क्युमिन कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस रोखू शकते. जेणेकरून त्या पेशी पसरण्याची क्षमता कमी होते.

फळे आणि भाज्या

काही फळे आणि भाज्यांचे सेवन केल्याने कर्करोगासह अनेक रोगांपासून संरक्षण होऊ शकते. ब्रोकोली, फ्लॉवर, ड्रमस्टिक, बीन्स आणि गाजर इत्यादींसारख्या भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात.

फायबरयुक्त पदार्थ

अन्नामध्ये फायबरच्या अभावामुळे पोटाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. जसे की बद्धकोष्ठता आणि पोटाचे विकार. परंतु, बद्धकोष्ठतेची समस्या दीर्घकाळ राहिल्यास पोटाचा कर्करोगही होऊ शकतो. त्यामुळे आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे.

उन्हाळ्यात रात्री कानाशी डास गुणगुणतात, झोपेचं वाटोळं? एका कांद्याचा करा खास उपाय, डास पळतील

ग्रीन टी

ग्रीन टी फक्त पोटासाठी नसून, वेट लॉससाठीही मदत करते. त्यात पॉलीफेनॉल आणि अँटीऑक्सिडंट असतात. शिवाय त्यात अँटी-कॅन्सर गुणधर्म देखील आढळते. दररोज एक ते दोन कप ग्रीन टीचे सेवन केल्यास कॅन्सरसह अनेक गंभीर आजारांपासून बचाव होऊ शकतो.

ड्रायफ्रुट्स

बदाम, अक्रोड आणि अळशीच्या  बिया यांसारख्या ड्रायफ्रुट्स आणि बियांमध्ये उच्च अँटिऑक्सिडंट्ससह अँटी-कॅन्सर गुणधर्म असतात. ज्यामुळे पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. 

Web Title: Foods to Lower Your Stomach Cancer Risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.